26 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरविशेषमहादेव बेटिंग ऍपवर केंद्र सरकारची बंदी!

महादेव बेटिंग ऍपवर केंद्र सरकारची बंदी!

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

Google News Follow

Related

केंद्र सरकारने महादेव बेटिंग ऍपसह अवैध सट्टेबाजी करणाऱ्या २२ ऍप आणि वेबसाइटला ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. महादेव बेटिंग ऍपसह एकूणच बेकायदा सट्टेबाजी करणाऱ्या ऍपची चौकशी सुरू आहे. त्यानुसार, आयटी मंत्रालयाने या ऍपवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. ईडीने केलेल्या शिफारसीनंतर माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील ६९ ए कलमानुसार, हे निर्देश देण्यात आले आहेत.

‘सट्टेबाजी ऍपच्या माध्यमातून होणाऱ्या बेकायदा व्यवहारांविरोधात भूपेश बघेल यांच्या सरकारतर्फे कोणतीही कारवाई झाली नाही. छत्तीसगढ सरकारकडे आयटी अधिनियमातील ६९ए कलमानुसार, वेबसाइट अथवा ऍप बंद करण्याची शिफारस करण्याचा अधिकार होता. कारण गेल्या दीड वर्षांपासून ते या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र आम्हाला ईडीकडून पहिलीच आणि एकमात्र विनंती मिळाली आहे आणि आम्ही त्यावर कारवाई केली,’ अशी माहिती आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी दिली.

हे ही वाचा:

पुण्यातील इसिस टेरर मॉड्यूल प्रकरणात सात आरोपींविरुद्ध एनआयएकडून आरोपपत्र दाखल

‘विराट’ वाढदिवस, सचिनच्या वनडे शतकांच्या विक्रमाशी बरोबरी

दोन फ्लॅट १५० खरेदीदारांना विकले, बेंगळुरूच्या बिल्डरला अटक!

इस्रायल-हमास वाद जुना आहे पण आता तो शिगेला पोचला!

महादेव बेटिंग ऍपच्या प्रवर्तकांनी छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना ५०८ कोटी रुपये दिल्याचा आरोप करण्यात येत आहे, ईडीने यातील मुख्य आरोपीचा जबाव नोंदवला असून त्यात त्याने हा खळबळजनक दावा केला आहे.
ईडीने एजेंट असीम दास याच्याकडून पाच कोटी ३९ लाख रुपये रोख रक्कम मिळाल्यानंतर रायपूरमधून अटक केली होती. तपास संस्थेनुसार, असिम दास याला ऍपच्या प्रवर्तकांनी यूएईला पाठवले होते. त्याला छत्तीसगढमध्ये काँग्रेसला निवडणूक खर्चासाठी मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम पाठवण्याचे काम दिले होते, असा आरोप आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा