मध्य रेल्वेला कमाईत मिळाले अव्वल स्थान!

मध्य रेल्वेला कमाईत मिळाले अव्वल स्थान!

मध्य रेल्वेसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेवरील सर्व विभागीय रेल्वेमध्ये कमाईत मध्य रेल्वेला प्रथम क्रमांकाचा मान मिळाला आहे. यावेळी मध्य रेल्वेला ११ महिन्यांच्या कालावधीत २८.८८ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. जो मागील वर्षी याच कालावधीत मिळालेल्या महसुलापेक्षा ३८ टक्के अधिक आहे.

मध्य रेल्वे मुंबईच्या जनसंपर्क विभागाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, मुंबई विभागाच्या मध्य रेल्वेने १ एप्रिल २०२१ ते २३ मार्च २०२२ या कालावधीत २१.९६ कोटी रुपयांसह भाडे नसलेल्या महसुलात आघाडीवर आहे. मुंबई विभागाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे प्रथमच विनाभाडे महसूल अंतर्गत वैयक्तिक काळजी केंद्र सुरू केले आहे. या उपक्रमातून मुंबईला पाच वर्षात ७५ लाख रुपयांचा महसूल मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकावरील वैयक्तिक काळजी केंद्राचे बांधकाम, संचालन, देखभाल आणि व्यवस्थापन यासाठी १४ लाख ७७ हजार रुपयांसाठी हे कंत्राट पाच वर्षांच्या कालावधीसाठी देण्यात आले आहे.

हे ही वाचा:

पुढील वर्षीपासून महिला आयपीएल स्पर्धेचा थरार रंगणार

‘राजकारण गेलं चुलीत, फक्त महाराष्ट्र ठीक राहिला पाहिजे’

….म्हणून मध्य प्रदेशचे गृहमंत्री मिश्रा झोमॅटो कंपनीवर भडकले

ढोंग, लबाडीची ‘केजरीवाल फाइल्स’

या संकल्पनेअंतर्गत, परवानाधारकाला वैयक्तिक काळजी वस्तू विकण्याची परवानगी दिली जाईल. या वस्तूंमध्ये आपत्कालीन, जेनेरिक आणि आयुर्वेदिक औषधे, सौंदर्य आणि कॉस्मेटिक उत्पादने इत्यादींचा समावेश आहे. बॉडी मसाज चेअरद्वारे मसाज, पात्र फिजिओथेरपिस्टद्वारे फिजिओथेरपी, केशभूषा, शेव्हिंग, फेशियल इत्यादी सलून सेवा वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असतील. नॉन-फेअर रेव्हेन्यू अंतर्गत असे आणखी बरेच उपक्रम घेतले जात आहेत ज्याचा प्रवाशांना फायदा होईल आणि रेल्वेला मोठा महसूल मिळणार आहे.

Exit mobile version