मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी उपनगरीय सेवा गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले आहे. अशातच बुधवार, २४ जुलै रोजी सकाळी पुन्हा एकदा मध्य रेल्वे विस्कळीत झाल्याची माहिती आहे. यामुळे ऑफिससाठी निघालेल्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर बांबू पडल्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.
बुधवारी सकाळीच पुन्हा एकदा मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी जलद मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. याचा जबरदस्त फटका प्रवाशांना बसला आहे. माटुंगा रेल्वे स्थानकाच्या जवळ कन्ट्रक्शन साईटचे बांबू ओव्हरहेड वायर वर पडल्यामुळे वाहतूक ठप्प होऊन गाड्यांच्या रांगा लागल्या आहेत. ओव्हरहेड वायर वरती बांबू पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. अनेक प्रवाशांनी ट्रॅकवर उतरुन पायी चालत जाणं पसंत केलं. सकाळी ऐन कामावर पोहोचण्याच्यावळी अशा घटना घडत असल्याने प्रवाशांमध्ये संतप्त भावना आहेत.
@AshwiniVaishnaw @drmmumbaicr @RailMinIndia @Central_Railway has truly raised the bar, moving from cables and pantographs to the exciting new challenge of bamboo falling from construction sites onto trains.
Does passenger safety really matter?@narendramodi_in @AmitShah pic.twitter.com/LH7wbwnEEt— Mandar D. Abhyankar™🗨️ 𝕏 (@mandar2005) July 24, 2024
मागच्या काही दिवसांपासून मुंबईत सतत पाऊस सुरु आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची सेवा वारंवार कोलमडली आहे. पावसामुळे रेल्वे रुळावर पाणी साचल्यामुळे लोकल विलंबाने धावतात. त्याचा फटका मुंबईकरांना सहन करावा लागतो. मागच्या काही दिवसांपासून मध्य रेल्वे रोज १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत आहे.
हे ही वाचा:
नीट यूजी परीक्षा रद्द होणार नाही, पुन्हा परीक्षा नाही…सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
करदात्यांना दिलासा, शेअर मार्केटला झटका
पत्रकार प्रदीप भंडारी आता भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते !
‘मोदी ३.0 सरकार’च्या अर्थसंकल्पानंतर काय स्वस्त, काय महाग?
मध्य रेल्वेने हा बिघाड लवकरच दूर केला जाईल आणि मुंबई लोकलची वाहतूक पूर्ववत केली जाईल, असं म्हटलं आहे. मात्र, अद्याप हे काम पूर्ण झालेलं नाही. सध्या मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांकडून हे बांबू हटवण्याचं काम सुरु आहे. दुसरीकडे लोकांनी चालत जाण्याचा पर्याय स्वीकारला आहे तसेच जलद लोकल हळूहळू धीम्या मार्गावर वळवण्यात येत आहेत.