मध्य रेल्वेची चित्रीकरणातून २ कोटींची कमाई; हे स्थानक सर्वाधिक पसंतीचे

मध्य रेल्वेची चित्रीकरणातून २ कोटींची कमाई; हे स्थानक सर्वाधिक पसंतीचे

मध्य रेल्वेने २०२१- २२ या आर्थिक वर्षात चित्रपटाच्या शूटिंगमधून कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. मध्य रेल्वेला २०२१- २२ या आर्थिक वर्षात विविध परिसर, स्थानक आणि रेल्वे डबे वापरून २ कोटी ४८ कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न मिळाले आहे. कोणत्याही आर्थिक वर्षात मध्य रेल्वेला मिळालेला हा सर्वाधिक महसूल आहे.

विविध चित्रपट निर्माते आणि प्रोडक्शन हाऊसद्वारे मध्य रेल्वेच्या वेगवेगळ्या ठिकाणी सुमारे १० चित्रपटांचे चित्रीकरण करण्यात आले. यामध्ये सहा फीचर फिल्म्स, दोन वेब सिरीज, एक शॉर्ट फिल्म आणि जाहिराती यांचा समावेश आहे. मध्य रेल्वेला सर्वाधिक १ कोटी २७ लाख ‘२ ब्राइड्स’ या फीचर फिल्मच्या शूटिंगमधून मिळवले. या चित्रपटाची शुटींग येवला, कान्हेगाव या स्थानकांवर विशेष ट्रेनसह १८ दिवस चालले. अदारकी रेल्वे स्थानकावर नऊ दिवसांसाठी विशेष ट्रेनसह शूट केलेल्या एका चित्रपटातून ६५.९५ लाख रुपये उत्पन्न मिळाले.

या आर्थिक वर्षातील २ लाख ४८ कोटी हे मध्य रेल्वेला चित्रपटाच्या शूटिंगमधून मिळालेले आतापर्यंतचे सर्वाधिक उत्पन्न असून २०१३- १४ या वर्षातील १ कोटी ७३ कोटींच्या आधीचे सर्वाधिक उत्पन्नाला मागे टाकले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) हे चित्रपट निर्मात्यांसाठी सर्वाधिक पसंतीचे चित्रपट शूटिंग स्थानक असून या रेल्वे स्थानकावर यंदा चार चित्रपटांचे चित्रीकरण करण्यात आले आहे. यामध्ये ‘मॉडर लव्ह- कटिंग चाय’ या चित्रपटाचा समावेश आहे. जुने वाडीबंदर यार्ड, सातारा जवळील अदारकी रेल्वे स्थानक, मनमाड, येवला, अहमदनगरमधील कान्हेगाव स्टेशन, दादर, मुलुंड आरपीएफ मैदान आणि माथेरान रेल्वे स्थानक आदी ठिकाणही शुटींगसाठी पसंतीची आहेत.

हे ही वाचा:

‘राज्यात नोटीस देण्याची परंपरा नव्हती’ अजित पवारांचा घरचा आहेर

भारतविरोधी जिहादसाठी केली जाणार होती मुस्लिम तरुणांची भर्ती

राज्यभर भाजपा आक्रमक; देवेंद्र फडणवीसांना पाठवलेल्या नोटिशीची होळी

देवेंद्र फडणवीसांची चौकशी सुरु

चित्रपटाच्या शूटिंगला परवानगी मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात येते. अलीकडेच चित्रपटाच्या शूटिंगची परवानगी जलद करण्यासाठी सिंगल विंडो सिस्टीम सुरू करण्यात आली आहे, या प्रक्रियेच्या सोप्या पद्धतीमुळे चित्रपट कंपन्यांना अर्ज सादर केल्यानंतर परवानगी मिळणे शक्य होते. यासाठी आवश्यक दस्तऐवजांसह स्क्रिप्ट आणि अर्जासह आवश्यकता नमूद करावी लागते.

“मध्य रेल्वेवर याआधी चित्रित झालेले स्लम डॉग मिलेनियर, रा-वन, प्रेम रतन धन पायो, दिलवाले दुलनिया ले जायेंगे, कमिने, रब ने बना दी जोडी, दरबार, कुछ कुछ होता है, दबंग, रंग दे बसंती, प्रेम रतन धन पायो, बागी, ​​खाकी यासारखे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाले आहेत,” असे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.

Exit mobile version