भारताच्या उत्तर आणि ईशान्य सीमा भागातील १२ महत्वाच्या रस्त्यांचे लोकार्पण

भारताच्या उत्तर आणि ईशान्य सीमा भागातील १२ महत्वाच्या रस्त्यांचे लोकार्पण

राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने बजावणार महत्वाची भूमिका

भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवार, १७ जून रोजी ईशान्य भारतातील १२ महत्वाच्या रस्त्यांचे लोकार्पण केले. हे १२ रस्ते ईशान्य भारताच्या सीमा भागातील असून राष्ट्रीय सुरक्षेच्या दृषटीने या रस्त्यांचे महत्व खूप जास्त आहे. बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन अर्थात बीआरओ मार्फत या रस्त्यांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.

आसाममधील लखीमपुर जिल्ह्यात या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राजनाथ सिंह यांनी २० किलोमीटर लांब किमिन-पोटिन या दुपदरी रस्त्याचे लोकार्पण केले. तर त्या सोबतच अरुणाचल प्रदेशातील ९ रस्त्यांचे लोकार्पण करण्यात आले आहे. तर लडाख आणि जम्मू-काश्मीरमधील प्रत्येकी एका रस्त्याचा समावेश आहे. बीआरओच्या ‘अरुणांक’, ‘वर्तक’, ‘ब्रह्मांक’, ‘उदयक’, ‘हिमांक’ और ‘संपर्क’ या पाच उपक्रमांच्या अंतर्गत हे रस्ते तयार करण्यात आले आहेत.

हे ही वाचा :

शिवसेनेत ‘राम’ राहिला नाही!

‘शर्मा यांच्यासह काम करणाऱ्या पंटर्सचा मनसुखच्या हत्येत हात’

‘तिसऱ्या लाटेचा धोका सांगता आणि डॉक्टरांची सेवाही खंडित करता’

अखेर प्रदीप शर्मा अटकेत

यावेळी बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बीआरओने केलेल्या कामाचे कौतुक केले. हे रस्ते आपल्या देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने खूप महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत. तसेच दुर्गम भागात अन्नधान्य आणि औषध पुरवठा करण्याच्या दृष्टीनेही या रस्त्यांचा वापर होणार आहे असे राजनाथ सिंह म्हणाले. ही रस्ते बांधणी भारत सरकारच्या ‘ऍक्ट ईस्ट’ धोरणाचा महत्वाचा घटक असणार आहे. ज्यात सीमावर्ती भागाचा विकास करण्यावर विशेष भर दिला जात आहे.

या प्रसंगी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू, केंद्रीय क्रिडा राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) श्री किरण रिजिजू, चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल बिपिन रावत हे उपस्थित होते. तर पूर्वोत्तर क्षेत्र विकास राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी व्हर्चुअल माध्यमातून आपला सहभाग नोंदवला.

Exit mobile version