रस्ते अपघातांना खराब प्रकल्प अहवाल जबाबदार

रस्ते अपघातांना खराब प्रकल्प अहवाल जबाबदार

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी काही रस्ते अपघातांसाठी सदोष प्रकल्प अहवालांना जबाबदार धरलं आहे. महामार्ग आणि इतर रस्त्यांच्या बांधकामासाठी डीपीआर अहवाल तयार करण्यासाठी कंपन्यांना योग्य प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. सरकार नवीन तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देत असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे.

कंपन्यांनी तयार केलेले काही डीपीआर सर्वात वाईट आहेत आणि ते रस्ते अपघातांसाठी जबाबदार असल्याचे गडकरी यांनी एका कार्यक्रमात सांगितले. डीपीआर तयार करणाऱ्या कंपन्यांनी सुधारणा न केल्यास, समस्या पुन्हा निर्माण होईल. डीपीआर तयार करणाऱ्या कंपन्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला आहे. गडकरींनी रस्ते प्रकल्पांना होणाऱ्या विलंबाची कारणे शोधण्यास सांगितले आहे. तसेच विलंबामुळे बांधकामाचा खर्च वाढेल, असंही नितीन गडकरी यांनी सांगितल आहे.

हे ही वाचा:

‘राज्यातील शिक्षकांच्या समस्या प्राधान्याने सोडवणार’

अफगाणिस्तानमध्ये रशियन दूतावासाजवळ स्फोट, २० जण ठार

‘उद्धव ठाकरे यांनी धोका दिला, धोका देणाऱ्याला शिक्षा मिळालीच पाहिजे’

‘मेधा पाटकर यांनी नर्मदा आंदोलनातून दिशाभूल केली आता माफी मागा’

रस्ते अपघातात १ लाख ५५ हजार लोकांचा मृत्यू

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार, २०२१ मध्ये संपूर्ण भारतात १ लाख ५५ हजाराहून अधिक लोकांनी रस्ते अपघातात आपला जीव गमावला. त्यानुसार दररोज आणि दर एका तासाला सरासरी ४२६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, जो आतापर्यंतच्या कोणत्याही कॅलेंडर वर्षातील सर्वाधिक मृत्यूची नोंद आहे. टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा रविवारी पालघर जिल्ह्यात कार दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात मृत्यू झाला.

Exit mobile version