‘दिल्लीच्या विमानभाड्यात असामान्य वाढ करू नका’

नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाचा इशारा

‘दिल्लीच्या विमानभाड्यात असामान्य वाढ करू नका’

दिल्लीच्या विमानतळावरील टर्मिनल १वर विमानांची ये-जा बंद असल्याने विमानभाड्यात असामान्य वाढ करू नये, असे नागरी विमान मंत्रालयाने शुक्रवारी हवाई कंपन्यांना बजावले आहे. विमानतळावरील टर्मिनल १चे छत कोसळल्यानंतर येथील विमान वाहतूक बंद करण्यात आली आहे.

शुक्रवारी पहाटे पाच वाजता टर्मिनल १वरील जुन्या वाहतूकमार्गावरील छताचा एक भाग कोसळला. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि किमान सहाजण जखमी झाले. या ठिकाणावरून इंडिगो आणि स्पाइसजेटच्या देशांतर्गत विमानांची वाहतूक होते.

टी-१ बंद झाल्यानंतर येथील उड्डाणे बंद करण्यात आली आहेत आणि ही उड्डाणे हंगामी काळासाठी टी-२ आणि टी-३वर स्थलांतरित करण्यात आली आहेत. त्यामुळे दिल्लीतून ये-जा करणाऱ्या कोणत्याही विमान प्रवासाच्या भाड्यात असामान्य वाढ करू नये, असे नागरी उड्डाण मंत्रालयाने विमान कंपन्यांना बजावले असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

हे ही वाचा:

बिहारमध्ये ११ दिवसांत पाच पूल कोसळले

ट्रम्प बायडेनना म्हणाले, मंच्युरियन. बायडेन म्हणाले तुम्ही ‘पराभूत’ 

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंतिम सामन्यात पाऊस पडल्यास काय होईल?

मानवी तस्करी प्रकरणी नौदलाच्या लेफ्टनंट कमांडरला अटक

‘उड्डाणे रद्द किंवा त्याची वेळ बदलण्यासाठी कोणतेही दंडात्मक शुल्क आकारू नये, असा सल्ला विमान कंपन्यांना देण्यात आला आहे,’ असे नागरी उड्डाण मंत्रालयाने ‘एक्स’वर नमूद केले आहे.

‘दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल -१वरील दुर्दैवी घटनेनंतर विमान कंपन्यांना सल्ला दिला जात आहे की, त्यांनी दिल्लीत ये-जा करणाऱ्या उड्डाणांत कोणत्याही असामान्य वाढीवर नजर ठेवावी आणि या संदर्भात आवश्यक कारवाई करावी,’ असे मंत्रालयाने ‘एक्स’वर नमूद केले आहे. एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, टी-१ दुर्घटनेनंतर इंडिगोची दिल्लीहून सुटणारी ६२ उड्डाणे आणि दिल्लीला आणणारी सात उड्डाणे रद्द केली आहेत. तर, स्पाइसजेटने दिल्लीतून सुटणारी आठ व येणारी चार उड्डाणे रद्द केली आहेत.

Exit mobile version