ऑक्सिजन पुरवठ्याशी निगडीत उपकरणांवरील आयात शुल्क माफ

ऑक्सिजन पुरवठ्याशी निगडीत उपकरणांवरील आयात शुल्क माफ

देशातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने स्तुत्य निर्णय घेतला आहे. मोदी सरकारने ऑक्सिजन निगडित उपकरणे, कोविड लस आणि इतर आरोग्य सुविधेतील उपकरणे यांवरील आयात शुल्क पूर्णपणे माफ केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविडच्या संदर्भात एच उच्चस्तरिय बैठक घेतली होती. या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे कळले आहे. याबाबत प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका पत्रकात याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे. त्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे.

हे ही वाचा:

मोदी सरकारने आणले ई-प्रॉपर्टी कार्ड, काय आहेत फायदे?

सिंगापूरमधूनही ऑक्सिजन वहनाचे टँकर्स

केंद्रीय महिला आयोगाने संजय राऊत यांची चौकशी करावी

…नाहीतर माझ्यावर कारवाई झाली असती- सुजय विखे पाटील

या पत्रकानुसार ऑक्सिजन, ऑक्सिजनच्या पुरवठ्याशी निगडीत विविध उपकरणे, ऑक्सिजनचा भरणा करणाऱ्या यंत्रणा, क्रायोजेनिक टँकर त्याचबरोबर रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या यंत्रणा, व्हेंटिलेटर इत्यादी उपकरणे यांवरील आयात शुल्क माफ करण्यात आले आहे.

या बैठकीच्या सुरूवातीलाच रेमडेसिवीर आणि त्याच्या निर्मीसाठी आवश्यक असलेले रासायनिक संयुग यांच्या आयातीवरील आयात शुल्क माफ करण्यात आल्याबद्दल पंतप्रधानांना सांगण्यात आले. त्याबरोबरच सर्व देशवासीयांसाठी जीवदान ठरणाऱ्या कोविडच्या लसीच्या आयातीवरील आयात शुल्क माफ करण्यात आल्याचे देखील या पत्रकात म्हटले आहे.

यामुळे या वस्तुंची देशांतर्गत वाढलेली गरज भागवली जाऊ शकेल अशी आशा देखील व्यक्त करण्यात आली आहे. हा निर्णय तात्काळ अंमलात आणला जाणार असून पुढील ३ महिन्यांसाठी वैध राहणार आहे. अर्थमंत्री, वाणिज्य आणि उद्योग मंत्री, आरोग्य मंत्री, पंतप्रधानांचे प्रधान सचिव, निती आयोगाचे सदस्य, डॉ गुलेरिया आणि महसूल विभागाचे सचिव, आरोग्य आणि डीपीआयआयटी आणि इतर अधिकाऱ्यांनी या बैठकीला उपस्थिती लावली होती.

Exit mobile version