केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी नवी दिल्लीमध्ये मणिपूरच्या सुरक्षास्थितीच्या आढाव्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली. मणिपूरमधील जातीय संघर्ष निवळण्यासाठी लवकरच केंद्र सरकार मैतेई आणि कुकी समाजातील नागरिकांशी चर्चा करेल, अशी माहिती अमित शहा यांनी दिली.
तेव्हा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकार मणिपूरच्या नागरिकांच्या सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी संपूर्णपणे कटिबद्ध आहे, अशी ग्वाही दिली. अमित शहा यांनी मणिपूरमध्ये शांतता आणि सौहार्द स्थापित करण्यासाठी केंद्रीय सुरक्षा दले तैनात करण्यास सांगितले. तसेच, आवश्यकता वाटल्यास सुरक्षा दलांची कुमक वाढवण्यासही सांगण्यात आले आहे.
हे ही वाचा:
राहुल गांधींकडून रायबरेलीची निवड; प्रियांका वायनाडमधून निवडणूक लढवणार
महाराष्ट्रात सुरू झालाय ‘फेक नरेटीव्ह सिझन-२
पोलीस भरतीची प्रक्रिया १९ जूनपासून होणार सुरु, गैरप्रकार आढळल्यास होणार गुन्हा दाखल!
महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी म्हणून दोन केंद्रीय मंत्र्यांची नियुक्ती!
गृहमंत्र्यांकडून निवाराछावण्यांचा आढावा
गृहमंत्र्यांनी विस्थापितांच्या निवाराछावण्यांच्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांचे जेवण, पाणी व औषधे आणि अन्य महत्त्वाच्या सुविधांचा पुरेसा पुरवठा करण्याचेही निर्देश दिले. त्यांनी मणिपूरच्या मुख्य सचिवांना योग्य आरोग्यसुविधा आणि शिक्षणसुविधा सुनिश्चित करणे तसेच, त्यांचे पुनर्वसन करण्याच्या सूचना केल्या. केंद्रीय गृहमंत्र्यांनी हिंसाचार करणाऱ्यांविरोधात कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.