आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना केंद्र सरकार मार्फत प्रदान करण्यात येणाऱ्या सुभाष चंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. गुजरात इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट आणि प्राध्यापक विनोद शर्मा हे २०२२ च्या सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. आज म्हणजेच २३ जानेवारी २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. तर २०१९, २०२० आणि २०२१ चे पुरस्कारही आजच पंतप्रधानांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहेत.
दरवर्षी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीदिनी २३ जानेवारीला हा पुरस्कार जाहीर केला जातो. संस्थेला ५१ लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र तर व्यक्तींना ५ लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावर्षीच्या पुरस्कारासाठी १ जुलै, २०२१ पासून नामांकने मागवण्यात आली होती. २०२२ च्या पुरस्कार योजनेला प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यापक प्रसिद्धी देण्यात आली. पुरस्कार योजनेला प्रतिसाद रूपाने संस्था आणि व्यक्तींकडून २४३ वैध नामांकन प्राप्त झाली होती. त्यातूनच गुजरात इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट आणि प्राध्यापक विनोद शर्मा यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
हे ही वाचा:
चीन नरमला; अपहृत तरुणाची करणार सुटका
नागपुरात एमपीएसी पेपरफुटी प्रकरणामुळे खळबळ; अभाविपचे तीव्र आंदोलन
‘नेताजींच्या जीवनमूल्यांचे अनुकरण करायला हवे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल’
योगींच्या प्रचारासाठी येणार ५०० परदेश स्थित भारतीय नागरिक
रविवार २३ जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आयोजित समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २०१९, २०२०आणि २०२१ वर्षांसाठी पुरस्कार दिले जाणार असून तेव्हाच या वर्षीचे पुरस्कारही प्रदान करण्यात येतील.