ऑक्सिजन, लसींच्या साठ्याचे ठाकरे सरकारने काय केले, ते कळलेच पाहिजे

ऑक्सिजन, लसींच्या साठ्याचे ठाकरे सरकारने काय केले, ते कळलेच पाहिजे

महाराष्ट्रामध्ये कोविडच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलेले असताना महाविकास आघाडी सरकारचा लसीकरणाच्या नियोजनातील ढिसाळपणा सातत्याने समोर आला आहे. यातच व्हेंटीलेटर्सच्या बाबतीत ठाकरे सरकारने केलेला घोटाळा आता समोर आला आहे. ठाकरे सरकारने केंद्राकडून मिळालेले व्हेंटीलेटर्स खासगी रुग्णालयाला विकल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यावरून भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. आता व्हेंटिलेटर सोबतच ऑक्सिजन आणि लसींचे ऑडिट देखील केंद्राने करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

दोन दिवसांपूर्वी केंद्राने राज्यांना मदत म्हणून पाठवलेले व्हेंटिलेटर वापराविना पडून असल्याचे समोर आले होते. त्यामुळे केंद्र सरकारने या व्हेंंटिलेटरच्या वापराचे ऑडिट करण्याचा निर्णय घेतला होता. त्यातच ठाकरे सरकारने या व्हेंटिलेटरमध्ये मोठा घपला केल्याचे देखील उघड झाले होते. ठाकरे सरकारने काही व्हेंटिलेटर चक्क परस्पर खासगी रुग्णालयांकडे वळविल्याचे उघड झाले होते. त्यावरून अतुल भातखळकरांनी सरकारला लक्ष्य केले होते.

हे ही वाचा:

अरबी समुद्रात वादळे जागतिक तापमानावाढीमुळे?

तौक्ते वादळ: मुंबईत दोन तासात १३२ झाडं पडली

टुकार सरकार सत्तेवर असल्यास, राज्यात कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडणारच

कोरोनामुळे नाही उपासमारीने आधी मरू

आता पुन्हा एकदा भातखळकरांनी सरकारवर हल्ला चढवला आहे. यावेळी त्यांनी व्हेंटिलेटरसोबत लसी आणि ऑक्सिजनचे देखील ऑडिट करावे अशी मागणी केली आहे. ट्वीटरद्वारे ही मागणी करताना, ठाकरे सरकारने किती साठा काळ्याबाजारात विकला आणि किती साठा लपवून ठेवला याची माहिती जनतेला मिळायला हवी असे त्यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारने व्हेंटिलेटर प्रमाणेच ऑक्सिजन आणि लसींचेही ऑडिट करावे. या घपलेबाज आघाडी सरकारने किती साठा काळ्याबाजारात विकला आणि किती साठा लपवून ठेवला आहे हे सत्य जनतेसमोर यायलाच हवे.

Exit mobile version