शेतकऱ्यांना कांदा निर्यातीबद्दल मोदी सरकारने मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी हटवली आहे. काही अटीशर्थी लागू करून निर्यातबंदी हटवण्यात आली आहे. ५५० डॉलर प्रति मेट्रिक टन किमान निर्यात शुल्क लागू करण्यात आले आहे. निर्यात शुल्क आकारल्यामुळे देशात कांद्याच्या किंमती वाढणार नाहीत, याची दक्षता सरकारने घेतल्याचं बोललं जात आहे.
सरकारने मोठा निर्णय घेत कांद्याच्या निर्यातीवरील बंदी हटवली आहे. मात्र, ५५० डॉलर प्रति मेट्रिक टन किमान निर्यात मूल्य ठेवण्यात आलं आहे. या निर्यात मूल्यानं कांद्याची निर्यात करणं शक्य होणार आहे. केंद्र सरकारने ७ डिसेंबर २०२३ ला निर्यातबंदी लागू करण्यात आली होती. त्यानंतर काही देशांमध्ये कांद्याची निर्यात सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती. अखेर शुक्रवारी रात्री केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने नवा निर्णय घेत निर्यातबंदी उठवली आहे. या निर्णयाचे निर्यातदारांनी स्वागत केले असून, शेतकऱ्यांनाही दिलासां मिळाला आहे.
हे ही वाचा:
ओडिशा: पुरी मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवाराने सोडले मैदान, पक्षाकडे तिकीट केले परत!
कॅनडा पोलिसांकडून तीन भारतीयांना अटक
‘रोहित वेमुला दलित नाही’; पोलिसांनी केली मृत्यूच्या तपासाची फाइल बंद
अमित शहा एडिटेड व्हिडीओ प्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई, काँग्रेस नेत्याला अटक!
दरम्यान, एका बाजूला कांद्याच्या निर्यातीवरील बंधने हटवली असली तरी दुसऱ्या बाजूला निर्यातीवर शुल्क आकारले जाणार आहे. कांद्याचे दर नियंत्रीत ठेवण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतलाय. कांद्याच्या निर्यातीवर बंदी असताना सरकारने शेजारील सहा देशांमध्ये कांदा निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली होती. यामध्ये बांगलादेश, संयुक्त अरब अमिराती, भूतान, बहरीन, मॉरिशिअस आणि श्रीलंका या सहा देशांचा समावेश आहे. या सर्व सहा देशांना मिळून ९९ हजार १५० टन कांदा निर्यात केला जाणार आहे.