28 C
Mumbai
Friday, November 22, 2024
घरविशेषसुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना कावेरी मोहीम आणणार सुरक्षित मायदेशी

सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना कावेरी मोहीम आणणार सुरक्षित मायदेशी

सुटका करण्यासाठी जवळपास ५०० भारतीय सुदान बंदरावर पोहोचले

Google News Follow

Related

सुदानमध्ये गृहयुद्ध सुरू असताना, सुदानी सैन्याने दुसऱ्या देशातील नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यास सहमती दर्शवली आहे. त्याचवेळी केंद्र सरकारने कावेरी मोहिमेच्या माध्यमातून सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्याचे काम हाती घेतले आहे. सुदानमध्ये अडकलेल्या आमच्या नागरिकांना परत आणण्यासाठी ऑपरेशन कावेरी सुरू आहे. अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी जवळपास ५०० भारतीय सुदान बंदरावर पोहोचलेले असून काही मार्गावर आहेत. या नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी जहाजे आणि विमाने सज्ज ठेवण्यात आली सुदानमधील आमच्या सर्व बांधवांना मदत करण्यासाठी आम्ही पूर्णपणे वचनबद्ध आहोत असे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटले आहे.

फ्रान्सने सुदानमध्ये अडकलेल्या भारतासह इतर २७ देशांतील नागरिकांना बाहेर काढले आहे. रविवारी रात्री लष्कराच्या दोन विमानांनी सुदानमधून २८ देशांतील ३८८ लोकांना बाहेर काढले आहे. यामध्ये भारतातील लोकांचाही समावेश आहे असे नवी दिल्लीतील फ्रेंच दूतावासाने सोमवारी स्पष्ट केले आहे. मात्र, किती भारतीयांची सुटका करण्यात आली हे सांगण्यात आलेले नाही.

सुदानमध्ये गेल्या ११ दिवसांपासून देशाचे लष्कर आणि निमलष्करी गट यांच्यात लढाई सुरू आहे. या लढ्यात आतापर्यंत सुमारे ४०० लोक मारले गेले आहेत. भारताने सौदी अरेबियाच्या जेद्दाह शहरात दोन जड-लिफ्ट लष्करी वाहतूक विमाने आणि हिंसाचारग्रस्त सुदानमधील एका प्रमुख बंदरावर नौदलाचे जहाज तैनात केले आहे. सध्या सुदानमध्ये राहणाऱ्या ३,००० पेक्षा जास्त भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करण्यात आले असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.

हे ही वाचा:

गावातील लोकांमध्ये फूट पाडून राजकीय पक्षांनी आपली दुकाने चालवली

नरेंद्र मोदींची लोकप्रियता उद्धव ठाकरेंची पोटदुखी

हिजाबपेक्षा शिक्षणाला महत्व देत कर्नाटकची तबस्सुम शेख पीयूसी परीक्षेत टॉपर

यात्रा कर घेऊनही गणपतीपुळ्यात पर्यटकांना सुविधांच्या नावाने बोंबच .. !

भारताने दोन सी-१३०जे लष्करी वाहतूक विमाने जेद्दाहमध्ये उड्डाण करण्यासाठी तयार ठेवली आहेत आणि भारतीय नौदलाचे जहाज या क्षेत्रातील एका महत्त्वाच्या बंदरावर पोहोचले आहे. भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी आकस्मिक योजना तयार ठेवण्यात आल्या आहेत असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा