भारत सरकारतर्फे पीक विमा सप्ताहाचा शुभारंभ

भारत सरकारतर्फे पीक विमा सप्ताहाचा शुभारंभ

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी गुरुवार, १ जुलै रोजी भारत सरकारच्या पीक विमा सप्ताहाचा शुभारंभ केला. भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल, केंद्र सरकारच्या ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून विशेष पीक विमा सप्ताह आयोजित केला आहे. ही एक प्रकारची जनजागृती मोहिम असून या मोहिमेत प्रधानमंत्री पीक विमा योजनेबद्दल जनतेमध्ये जागृती केली जाणार आहे.

प्रधानमंत्री फसल विमा योजना ही भारत सरकारच्या महत्वाकांक्षी योजनांपैकी एक आहे. भारत सरकारच्या या महत्वाच्या योजनेच्या अंतर्गत आत्तापर्यंत ९५,००० कोटी रुपयांची मदत देशातील शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी या उपक्रमाचे महत्व समजावून सांगितले. ‘फसल बिमा योजनेचा उद्देश देशातील प्रत्येक शेतकऱ्याला विमाकवच देणे हा आहे.’ असे यावेळी बोलतांना, नरेंद्र सिंह तोमर म्हणाले. जनतेचे ९५,००० कोटींचे विम्याचे दावे मंजूर करून त्यांना मदत करत या योजनेने एक विक्रमी टप्पा ओलांडला आहे असे तोमर म्हणाले. तर या योजनेच्या अंमलबजावणीत राज्य सरकार आणि विमा  कंपन्याची भूमिका अत्यंत महत्वाची आहे, असेही त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

पाच लाख लशींच्या कुप्या गायब झाल्या तरी कुठे?

आता बस झाले! दुकानांची वेळ वाढवा!!

दहा हजार गुंड आणण्याचे आदेश मातोश्रीवरून?

शिंदे, पालांडे यांची कोठडी ६ जुलैपर्यंत वाढविली

यावेळी कृषीमंत्र्यांनी आयईसी या विशेष व्हॅन्सला देखील हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या व्हॅनच्या माध्यमातून, प्रधानमंत्री पीक विमा योजनेविषयी जनजागृती करत,१ ते ७ जुलै या सप्ताहात, अधिकाधिक शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. जनजागृती मोहिमेसाठीची पत्रके, वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नावलीची पुस्तिका आणि मागर्दर्शक पुस्तिकेचेही त्यांनी प्रकाशन केले. या साहित्यामुळे, समन्वयकांना, शेतकऱ्यांना या योजनेचे लाभ आणि प्रक्रीयेविषयी माहिती सांगणे, सोपे जाणार आहे.

Exit mobile version