केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा आयुष योजनेला मुदतवाढ मंजूर करण्यात आली आहे. १ एप्रिल २०२१ पासून या योजनेला ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. २०१४ साली सप्टेंबर महिन्यात मोदी सरकारच्या माध्यमातून या योजनेची सुरुवात करण्यात आली. या योजनेची एकूण व्याप्ती लक्षात हेत ४६०७.३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
पारंपारिक वैद्यकीय ज्ञानाला आणि पद्धतीला प्रोत्साहन देणाऱ्या आयुष्य योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय भारत सरकारतर्फे घेण्यात आला आहे. बुधवार, १४ जुलै रोजी भारत सरकार मार्फत हा निर्णय घेतला गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला आहे.
हे ही वाचा:
जनतेसाठी पैसा नाही, पण मंत्र्यांसाठी उभारणार आलिशान टॉवर
केंद्र सरकारने दिली खुशखबर…महागाई भत्त्यात वाढ
काश्मीरमधील गावात जेव्हा पहिल्यांदाच वीज पोहोचते…
पियुष गोयल भाजपाचे राज्यसभेतील नेते
भारताला आयुर्वेद, सिद्ध, सोवा रिग्पा, युनानी आणि होमिओपॅथी यासारख्या पारंपारिक उपचारांचा अजोड वारसा लाभला आहे. वैविध्यपूर्णता, लवचिकता, उपलब्धता, किफायतशीरपणा आणि समाजातील सर्व थरातील माणसांकडून मनोमन स्विकार ही या भारतीय औषधोपचारांची वैशिष्ट्ये आहेत. या उपचार पद्धतींचा प्रचार प्रसार करण्यासाठी भारत सरकारकडून पाऊले उचलली जाणार आहेत.
केंद्र सरकारच्या या महत्वाकांक्षी योजनेची उद्दिष्टे आणि फलित खालीलप्रमाणे आहे
- आयुष उपचारपद्धती उपलब्ध करून देणारी वाढती उपचार केंद्रे आणि त्या उपचारपद्धतीतील औषधांची तसेच त्यातील तज्ञांची वाढती उपलब्धता.
- आयुष उपचारपद्धतीचे शिक्षण देणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन देउन त्याद्वारे आयुष उपचारासंबधी शिक्षणाचा दर्जा वाढवणे,
- सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमांद्वारे आयुष उपचारांच्या माध्यमातून सांसर्गिक तसेच असांसर्गिक आजारांना अटकाव करण्याचे लक्ष्य.