एकीकडे मुंबई उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत असताना केंद्र सरकारने यावर दिलासादायक फुंकर घातली आहे. मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल गाड्यांमध्ये एसी लोकलच्या तिकिटाचे दर कमी करण्यात आले आहेत. एकीकडे सर्वत्र उन्हाच्या झळा जाणवत असताना मुंबईतल्या चाकरमान्यांसाठी अतिशय दिलासादायक बाब ठरत आहे मुंबईतील एसी लोकलच्या तिकिटाचे दर तब्बल पन्नास टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. नागपूर येथे ते बोलत होते.
केंद्र सरकार मार्फत मुंबईमध्ये यशस्वीपणे एसी लोकल सुरू करण्यात आली असली तरी देखील या लोकलचे तिकीट दर लक्षात घेता नागरिकांचा म्हणावा तितका प्रतिसाद या गाड्यांना मिळत नव्हता. मात्र आता मुंबईतले वाढते तापमान लक्षात घेता एसी लोकल ही नागरिकांसाठी आवश्यकता बनताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने एसी लोकांच्या तिकीट दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
हे ही वाचा:
ठाकरे सरकार विरोधात किरीट सोमय्या न्यायालयात
संगमनेरमध्ये कांदा व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची फसवणूक
शिवसेना खासदार राहुल शेवाळेंवर बलात्काराचा आरोप
शिवसेना खासदार भावना गवळींना अटक होणार?
गेल्या काही दिवसापासुनच लोकलचे दर कमी होणार असल्याची चर्चा पाहायला मिळत होती. त्यामुळे तिला आता दुजोरा मिळाला असून प्रत्यक्षात हे दर कमी झालेले पाहायला मिळत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री यांचे आभार मानले आहे. मुंबईमध्ये सध्या मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या धावपट्टीवर एसी लोकल धावत आहेत. तिकीट दरात कपात करण्याच्या या निर्णयामुळे आता या गाड्यांना जनतेचा अधिकाधिक प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.