स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने टोमॅटो ५० रुपये किलोने विकण्याचा निर्णय घेतला आहे. जुलैमध्ये अन्नधान्य महागाईचा दर ११.५१ टक्क्यांवर पोहोचला आहे. यानंतर हा निर्णय सरकारच्या वतीने घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने एनसीसीएफ आणि नाफेडला टोमॅटो ५० रुपये किलोने विकण्याच्या सूचना दिल्या आहेत. अलीकडेच घाऊक बाजारात टोमॅटोच्या किमतीमध्ये घट झाली असल्याचे ग्राहक व्यवहार मंत्रालयाने सांगितले असल्याने ५० रुपये किलोने टोमॅटो विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
१३ ऑगस्टपर्यंत नाफेड आणि एनसीसीएफने किरकोळ बाजारात १५ लाख किलो टोमॅटोची खरेदी आणि विक्री केली आहे. दिल्ली एनसीआर व्यतिरिक्त राजस्थानमधील जोधपूर कोटा, उत्तर प्रदेशातील लखनऊ, कानपूर, वाराणसी, प्रयागराज आणि बिहारमधील पटना, मुझफ्फरपूर, आराह, बक्सरमध्ये टोमॅटो स्वस्त दरात विकले गेले आहेत.
हे ही वाचा:
तारीख ठरली!! विवेक अग्निहोत्रींचा ‘द व्हॅक्सीन वॉर’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक बिंदेश्वर पाठक यांचे निधन
पंतप्रधान मोदींकडून ‘विश्वकर्मा योजने’ची घोषणा !
अमेरिकेचे विमान तीन मिनिटांत १५ हजार फूट खाली; प्रवाशांची भीतीने गाळण
प्रथम एनसीसीएफ आणि नाफेडने टोमॅटो ९० रुपये प्रतिकिलो दराने विकण्यास सुरुवात केली, त्यानंतर १६ जुलैपासून दर ८० रुपये प्रति किलोपर्यंत कमी केले. २० जुलैपासून दर ७० रुपये करण्यात आले आणि आता स्वातंत्र्य दिनापासून टोमॅटो ५० रुपये किलोने विकला जाणार आहे. गेल्या काही दिवसात टोमॅटोचे दर चांगलेच वधारले होते. दर वाढल्याने शेतकऱ्यांच्या पदरात काही रक्कम पडत होती.