झेब्र्यांमध्ये असलेल्या या रोगामुळे आयातीला विरोध

इस्रायली झेब्य्रांमध्ये 'आफ्रिकन हॉर्स सिकनेस' नावांचा आजार असू शकतो. या करणसत्व केंद्राने झेब्य्रांची आयात रोखली.

झेब्र्यांमध्ये असलेल्या या रोगामुळे आयातीला विरोध

केंद्र सरकारचा निर्णय

माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हट्टापायी आफ्रिकन पेंग्विन भायखळा येथील राणीच्या बागेत आणले होते. २०२० मध्ये राणीची बाग प्राणी संग्रहालयाने इस्त्रायलकडे २ झेब्य्रांची मागणी नोंदवली होती. हे झेब्रे गुजरात जुनागढ येथील सक्करबाग प्राणी संग्रहालायाला देऊन, तेथून आशियाई सिंह मागविण्यात येणार होते. हे कंत्राट थायलंडच्या कंपनीला देण्यात येणार होते. मात्र इस्रायकडून मागवलेल्या २ झेब्रांच्या आयातीला केंद्र सरकारने आक्षेप घेतला आहे.

जागतिक पातळीवर प्राण्यांसाठी कार्यरत असलेल्या संघटनेने ‘वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर ऍनिमल’ हेल्थने ‘निरोगी’ प्रमाणपत्र दिलेले नाही. तसेच भारतामध्ये आयात होणाऱ्या प्रत्येक प्राण्याला ‘निरोगी’ प्रमाणपत्र दिले जाते. इस्त्रायल मधील कोणत्याही प्राण्याला निरोगी प्रमाणपत्र दिलेले नाहीत. तसेच इस्रायलमधील झेब्य्रांमध्ये ‘आफ्रिकन हॉर्स सिकनेस’ नावाचा आजार असू शकतो. हा एक प्रकारे हाडांचा आजार आहे. व तो एका प्राण्यांकडून दुसऱ्या प्राण्यांमध्ये संक्रमित होऊ शकतो. त्याचा संसर्ग माकड, घोडे आदी प्राण्यांना होण्याची शक्यता असते. याच कारणाने केंद्राने या झेब्रांची आयात रोखली आहे.

हे ही वाचा:

“पाकिस्तानी खेळाडू पदकं जिंकत आहेत हे नेत्यांना माहित आहे का?” पाक पत्रकाराचा सवाल

क्रिकेटमध्ये महिलांची ऐतिहासिक कामगिरी; रौप्यपदकावर कोरलं नाव

अमृता फडणवीस यांना ‘त्या’ गाण्यात का दिसला उद्धव ठाकरेंचा चेहरा

संजय राऊत २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत

‘आफ्रिकन हॉर्स सिकनेस’ नावाचा हाडांच्या आजाराचे विषाणू झपाटयाने वाढून १५६९ मध्ये पहिल्यांदा पूर्व आफ्रिकेत याचे जिवाणू सापडले. त्यानंतर त्यांचे संक्रमण उत्तर आफ्रिका. पश्चिम आशिया, अरब देश आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात पसरत गेले.

Exit mobile version