जम्मू काश्मीर बस अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना केंद्राकडून मदत

पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त

जम्मू काश्मीर बस अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना केंद्राकडून मदत

जम्मू काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना घडली असून एक प्रवासी बस दरीत कोसळून मोठा अपघात झाला आहे. या अपघातात ३० जणांचा मृत्यू झाला आहे. प्रवासी बस २५० फूट खोल दरीत कोसळून हा भीषण अपघात झाला. अपघातग्रस्त बसमध्ये सुमारे ४० प्रवासी होते. दुर्घटनास्थळी सध्या बचावकार्य सुरु असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू आणि काश्मीरमधील डोडा येथे बस अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधी मधून प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना २ लाख रुपयांची तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

हे ही वाचा:

ऐन दिवाळीत कॅनडात खलिस्तानी आणि हिंदूंमध्ये संघर्ष!

पंतप्रधान मोदींविषयी केलेल्या चुकीच्या वक्तव्यामुळे केजरीवाल, प्रियांका गांधींना नोटीस

५.२ रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या धक्क्याने पाकिस्तान हादरले

सुब्रत रॉय यांनी दोन हजार रुपयांत गोरखपूरमधून व्यवसायाची सुरुवात

पंतप्रधान कार्यालयाने याबद्दल ट्विट केले आहे. “जम्मू आणि काश्मीरमधील डोडा येथे झालेला बस अपघात दुःखदायक आहे. ज्या कुटुंबांनी आपले जवळचे नातेवाईक आणि प्रियजन गमावले आहेत त्यांच्यासोबत माझ्या संवेदना. या अपघातात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी मी प्रार्थना करतो.” प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधी मधून (PMNRF) प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना २ लाख रुपयांची तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत दिली जाईल.

Exit mobile version