गणेश भक्तांसाठी मध्य रेल्वेकडून विशेष लोकल फेऱ्या

भाविकांना बाप्पाला निरोप देऊन सुखरूप घरी पोहचता यावं यासाठी मध्य रेल्वेकडून विशेष तयारी करण्यात आली आहे.

गणेश भक्तांसाठी मध्य रेल्वेकडून विशेष लोकल फेऱ्या

मुंबईसह राज्यात आज अनंत चतुर्दशीचा उत्साह दिसून येत आहे. मुंबईतील मोठ्या मंडळांच्या विसर्जन मिरवणूका निघाल्या असून लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली आहे. सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज असून भाविकांना बाप्पाला निरोप देऊन सुखरूप घरी पोहचता यावं यासाठी मध्य रेल्वेकडून विशेष तयारी करण्यात आली आहे.

लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आणि विसर्जन मिरवणुकांमध्ये सहभागी होण्यासाठी राज्यभरातून भक्त लालबाग, परळ, गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी येथे येत असतात. या भाविकांना रात्री सुखरूप घरी पोहचता यावं यासाठी खास प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने उद्या दिनांक १० सप्टेंबर २०२२ म्हणजेच आज ९ सप्टेंबर २०२२ च्या मध्यरात्री विशेष उपनगरीय लोकल सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते कल्याण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते पनवेल या स्थानकांदरम्यान दहा उपनगरीय गाड्या चालवल्या जाणार आहेत. या उपनगरीय लोकल गाड्या सर्व स्थानकांवर थांबणार आहेत.

हे ही वाचा:

गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या… दहा दिवसांच्या बाप्पाला निरोप

डायमंड लीग जिंकणारा नीरज चोप्रा पहिला भारतीय

पंतप्रधान मोदींनी सांगितली दुसऱ्या एलिझाबेथ यांच्या भेटीची आठवण

अमरावतीमधील ‘ती’ मुलगी जबाबात म्हणाली…

मेन लाईन- अप विशेष लोकल

मेन लाईन- डाऊन विशेष लोकल

हार्बर लाईन- अप विशेष लोकल

हार्बर लाईन- अप विशेष लोकल

Exit mobile version