27 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरविशेषगणेश भक्तांसाठी मध्य रेल्वेकडून विशेष लोकल फेऱ्या

गणेश भक्तांसाठी मध्य रेल्वेकडून विशेष लोकल फेऱ्या

भाविकांना बाप्पाला निरोप देऊन सुखरूप घरी पोहचता यावं यासाठी मध्य रेल्वेकडून विशेष तयारी करण्यात आली आहे.

Google News Follow

Related

मुंबईसह राज्यात आज अनंत चतुर्दशीचा उत्साह दिसून येत आहे. मुंबईतील मोठ्या मंडळांच्या विसर्जन मिरवणूका निघाल्या असून लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली आहे. सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज असून भाविकांना बाप्पाला निरोप देऊन सुखरूप घरी पोहचता यावं यासाठी मध्य रेल्वेकडून विशेष तयारी करण्यात आली आहे.

लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आणि विसर्जन मिरवणुकांमध्ये सहभागी होण्यासाठी राज्यभरातून भक्त लालबाग, परळ, गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी येथे येत असतात. या भाविकांना रात्री सुखरूप घरी पोहचता यावं यासाठी खास प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने उद्या दिनांक १० सप्टेंबर २०२२ म्हणजेच आज ९ सप्टेंबर २०२२ च्या मध्यरात्री विशेष उपनगरीय लोकल सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते कल्याण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते पनवेल या स्थानकांदरम्यान दहा उपनगरीय गाड्या चालवल्या जाणार आहेत. या उपनगरीय लोकल गाड्या सर्व स्थानकांवर थांबणार आहेत.

हे ही वाचा:

गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या… दहा दिवसांच्या बाप्पाला निरोप

डायमंड लीग जिंकणारा नीरज चोप्रा पहिला भारतीय

पंतप्रधान मोदींनी सांगितली दुसऱ्या एलिझाबेथ यांच्या भेटीची आठवण

अमरावतीमधील ‘ती’ मुलगी जबाबात म्हणाली…

मेन लाईन- अप विशेष लोकल

  • कल्याणवरून ००.०५ वाजता सुटेल आणि १.३० वाजता सीएसएमटीला पोहचेल
  • ठाण्यावरून ०१.०० वाजता सुटेल आणि ०२.०० वाजता सीएसएमटीला पोहचेल
  • ठाण्यावरून ०२.०० वाजता सुटेल आणि ०३.०० वाजता सीएसएमटीला पोहचेल

मेन लाईन- डाऊन विशेष लोकल

  • सीएसएमटीवरून ०१.४० वाजता सुटेल आणि ०३.१० वाजता कल्याणला पोहचेल
  • सीएसएमटीवरून ०२.३० वाजता सुटेल आणि ०३.३० वाजता ठाण्याला पोहचेल
  • सीएसएमटीवरून ०३.२५ वाजता सुटेल आणि ०४.५५ वाजता कल्याणला पोहचेल

हार्बर लाईन- अप विशेष लोकल

  • पनवेलवरून ०१.०० वाजता सुटेल आणि ०२.२० वाजता सीएसएमटीला पोहचेल
  • पनवेलवरून ०१.४५ वाजता सुटेल आणि ०३.०५ वाजता सीएसएमटीला पोहचेल

हार्बर लाईन- अप विशेष लोकल

  • सीएसएमटीवरून ०१.३० वाजता सुटेल आणि ०२.५० वाजता पनवेलला पोहचेल
  • सीएसएमटीवरून ०२.४५ वाजता सुटेल आणि ०४.०५ वाजता पनवेलला पोहचेल
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा