गेल्या १० दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने पुन्हा चर्चेचे आमंत्रण दिले असून शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. दिल्लीकडे कूच करू न शकल्यामुळे शेतकरी चिंतेत असले तरी त्यांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. पण शंभू सीमेवरून सुमारे २५ टक्के आंदोलक आणि ट्रॅक्टर-ट्रॉलींची संख्या घटली आहे. तर, खनौरी सीमेवर जास्त नुकसान झाल्यामुळे मोठ्या संख्येने आंदोलक व वाहने तेथे गेल्याचे शेतकरी नेत्यांचे म्हणणे आहे.
पुढचे आदेश मिळेपर्यंत मोठ्या संख्येने शेतकरी सीमेवर पोहोचतील, असे सांगितले जात आहे. गुरुवारी तिथे पोकलेन व जेसीबी मशिन दिसली. परंतु मोठ्या संख्येने क्रेन, ट्रॅक्टर व अन्य जेसीबी वाहने तिथे नव्हती. हरियाणाच्या टोल बॅरिअरपासून शंभू सीमेपर्यंत बुधवारपर्यंत पाय ठेवायलाही जागा नव्हती. तिथे गुरुवार संध्याकाळपर्यंत या परिसरात शुकशुकाट जाणवत होता.
हे ही वाचा:
‘राहुल गांधी यांना भेटण्यासाठी १० किलो वजन कमी करण्यास सांगितले गेले’!
युक्रेन-रशिया संघर्षापासून दूर राहा
शेतकरी आंदोलनात मृत्यू झालेल्या शुभकरन सिंहच्या कुटुंबियांना मिळणार एक कोटींची भरपाई!
रामलल्लाच्या दरबारात महिन्याभरात ६२ लाख भाविकांची हजेरी
शेतकरी नेते सातत्याने भाषण देऊन शेतकऱ्यांना उत्तेजन देत आहेत. मात्र उपस्थित शेतकऱ्यांची संख्या घटली आहे. केंद्र सरकारने आतापर्यंत शेतकऱ्यांशी चर्चा केली आहे. मात्र ती निष्फळ ठरली आहे. आता शुक्रवारी पुन्हा केंद्र सरकारच्या प्रतिनिधींशी शेतकऱ्यांची चर्चा होईल. ही दोहोंमधील बैठकीची पाचवी फेरी असेल. तेव्हाच त्यांच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरेल. सध्या शंभू सीमेवर ठिकठिकाणी लंगर चालवले जात आहेत. शेतकऱ्यांवर उपचारासाठी वैद्यकीय पथकही सज्ज आहे.