कांद्याचा प्रश्न मिटला, लासलगाव, सोलापूरमध्ये लिलाव सुरू

केंद्राने कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बदलले चित्र

कांद्याचा प्रश्न मिटला, लासलगाव, सोलापूरमध्ये लिलाव सुरू

केंद्र सरकारने २ लाख टन कांदा खरेदी करण्याचे आश्वासन देण्यात आल्यानंतर आणि कांद्याला २४१० रुपये प्रतिक्विंटल भाव देणार असल्याचे जाहीर करण्यात आल्यानंतर कांदा व्यापाऱ्यांनी पुकारलेला बंद मागे घेण्यात आला आहे. आता विविध बाजारसमित्यांमध्ये कांद्याच्या लिलावाला प्रारंभ सुरू झाला आहे.

 

केंद्रीय मंत्री भारती पवार आणि नाफेडच्या माध्यमातून बुधवारी पत्रकार परिषद घेऊन कांद्याच्या संदर्भात केंद्राने घेतलेल्या निर्णयाची माहिती देण्यात आली.

 

हे ही वाचा:

इटलीत नोकरी देतो सांगितले; पण लिबियात सशस्त्र गटाच्या तावडीत सापडले

गुजरातच्या तुरुंगात कैद्यांना आणि हिऱ्यांना पाडले जातात पैलू!

प्रज्ञानंद- कार्लसन पहिला डाव बरोबरीत

आठ कोटीच्या चिंधी घोटाळ्याचे धागेदोरेही कलानगरकडे बोट दाखवतायत…

केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के कर लावला होता. जेणेकरून कांद्याची स्थानिक बाजारातच विक्री होईल आणि भारतात त्याचे भाव स्थिर राहतील. पण त्यातून कांदा उत्पादकांनी आंदोलने सुरू केली. बाजारसमित्या बंद करण्याचे इशारे देण्यात आले. त्याचवेळी महाराष्ट्रातील कृषिमंत्री धनंजय मुंडे हे केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना भेटले त्याआधीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारशी संपर्क साधून कांदा खरेदी करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करून घेतले. त्यानंतर नाफेडने कांदा खरेदीचा निर्णय घेतला. कांद्याला २४१० रु. प्रतिक्विंटर भाव देण्याचेही ठरविले गेले. त्यातून मग ही आंदोलने थांबली.

 

 

नाशिक येथे भारती पवार यांनी आढावा बैठक घेतली. त्यात नाफेडचे अधिकारी, जिल्हा उपनिबंधक, कांदा व्यापारी उपस्थित होते. त्यात बाजारसमित्यांमध्ये कांद्याच्या लिलावाला प्रारंभ करण्यात यावा असे आवाहन करण्यात आले. २४१० रु. भाव देण्यात आल्याचेही सांगण्यात आले. त्यानंतर शेतकरी व व्यापारी असोसिएशनची बैठक झाली आणि त्यानंतर बाजारसमित्यांमध्ये कांद्याचा लिलावाचा मार्ग मोकळा करण्यात आला. ४० टक्के कराबाबत विचार करणार असल्याचे आश्वासन भारती पवार यांनी दिले.

Exit mobile version