देशात कोविडचे संकट गहिरे होत आहे. त्यावर मात करण्यासाठी लसीकरण हे एक अतिशय प्रभावी माध्यम म्हणून समोर आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी हे स्पष्ट केले की, प्रत्येक राज्याला त्याच्या कार्यक्षमतेनुसार लसींचा पुरवठा केला जात आहे.
देशात लसीकरण मोहिम मोठ्या प्रमाणावर राबवली जात आहे. कोविडच्या विळख्यातून वाचायचा तो उत्तम मार्ग असल्याचे म्हटले जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी लसीकरणाबाबत बोलताना सांगितले की, लसीकरणातील राज्याच्या कामगिरीनुसार त्यांना लसी पुरवल्या जात आहेत. केंद्र सरकारने आत्तापर्यंत १६ कोटी डोस पुरवले असून त्यापैकी १५ कोटी डोस दिले गेले आहेत.
हे ही वाचा:
‘अपोलो-११’चे वैमानिक मायकल कॉलिन्स यांचे निधन
केंद्रीय मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार राज्यांकडे अजूनही १ कोटी डोस शिल्लक आहे. त्याबरोबर त्यांनी ही देखील माहिती दिली की सुमारे २-३ लाख डोस मार्गावर असून लवकरच राज्यांपर्यंत पोहोचतील.
“लसीकरणाला सुरूवात झाल्यापासून एकही दिवस असा गेला नाही, जेव्हा राज्यांना त्यांच्या क्षमतेनुसार डोस पुरवले गेले नाहीत.”
मंत्रालयाच्या सांगण्यानुसार एकूण लसीकरण झालेल्या लोकांची संख्या ही १५ कोटी झाली आहे. गुरूवारी सकाळी ७ वाजता प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार देशात सुमारे १५ कोटी २० हजाक ६४८ लोकांचे लसीकरण झाले आहे.
भारताने जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेला १६ जानेवारी २०२१ पासून सुरूवात केली. भारत हा १० कोटी लोकांना केवळ ८५ दिवसात लस देऊन जगातील सर्वात वेगाने हा टप्पा गाठणारा देश ठरला होता. कोविडचा विळखा देशात अधिक घट्ट होत असल्याचे पाहून केंद्र सरकारने १ मे पासून देशातील सर्व प्रौढ नागरिकांचे लसीकरण करण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यासाठी लसींची कमतरता पडू नये म्हणून सध्या वापरात असलेल्या दोन लसींसोबत अजून चार विदेशी लसींच्या आपात्कालीन वापराला देखील मान्यता देण्यात आली आहे.