स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गाला केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाली आहे. पुणेकरांसाठी हा नवा मेट्रो मार्ग आता दिमतीला हजर असेल. या नव्याने होणार असणाऱ्या मार्गिकेला लाईन १ बी असे नाव दिले जाणार आहे. हे अंतर सुमारे ५.४६ किमी असे असेल.
पुणे मेट्रो फेज -१ प्रकल्पाच्या स्वारगेट ते कात्रज अशा सुमारे साडेपाच किमी लांबीच्या विस्तारास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे पुणेकरांचा प्रवास आता अधिक सुखकर होण्यास मदत होणार आहे. हा प्रकल्प साधारण २०२९ पर्यंत पूर्ण होऊन त्याचे लोकार्पण करण्यात येईल. यासाठी सुमारे २ हजर ९५४ कोटी रुपये खर्च येणार आहे.
हेही वाचा..
गंगा नदी मार्गावरील पुलाचा एक भाग तिसऱ्यांदा कोसळला
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर जमीन घोटाळ्याप्रकरणी कारवाई होणार, राज्यपालांनी दिली मंजुरी !
‘त्या’ डॉक्टरच्या हत्या प्रकरणी महिला आयोग आक्रमक
मार्केट यार्ड, बिबवेवाडी, बालाजी नगर आणि कात्रज ही उपनगर या मार्गात येणार असल्याने या परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. हे काम महा मेट्रोकडून काम करण्यात येणार आहे. केवळ पुणेच नाही तर ठाणे शहरालाही या नव्या मेट्रोची भेट केंद्र सरकारने दिली आहे.