उस्मानाबाद आता झाले धाराशिव; औरंगाबादचा निर्णय मात्र विचाराधीन

केंद्र सरकारने दिली माहिती

उस्मानाबाद आता झाले धाराशिव; औरंगाबादचा निर्णय मात्र विचाराधीन

उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव आता अधिकृतपणे धाराशिव झाले आहे अशी माहिती केंद्र सरकारने न्यायालयात दिली आहे.न्यायमूर्ती एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारला मागील महिन्यात विचारले होते की, उस्मानाबाद आणि औरंगाबाद या शहरांची नावे बदलण्याचा महाराष्ट्र सरकारचा काही प्रस्ताव आहे का? तसे असल्यास प्रस्ताव मान्य झाला आहे का अशी विचारणा सुद्धा केली होती. त्यावर हे स्पष्टीकरण दिले आहे.

केंद्र सरकारने १५ फेब्रुवारीला मुंबई उच्च न्यायालयात उस्मानाबाद शहराचे नाव बदलून त्याचे नाव आता ‘धाराशिव’ असे करण्यात आले आहे, असे सांगितले. मात्र औरंगाबाद शहराचे नाव बदलून संभाजी नगर करण्याची प्रक्रिया अद्याप सुरु असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

केंद्र सरकारच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी खंडपीठाला सांगितले की, केंद्राला राज्य सरकारकडून प्रस्ताव प्राप्त झाला . केंद्राने दोन फेब्रुवारी रोजी राज्य सरकारला उस्मानाबादचे नामांतर करण्यास हरकत नसल्याचे कळवले होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांच्या मंत्रिमंडळाने गेल्या वर्षी औरंगाबादचे नाव बदलून संभाजी नगर आणि उस्मानाबादचे नाव बदलून धाराशिव करण्यासाठी मान्यता दिली होती.

हे ही वाचा:

महाशिवरात्रीसाठी बेस्ट तर्फे विशेष बस सेवा

शिवजयंतीला घ्या शिवसृष्टीतील सरकारवाड्याचा अनुभव

सुकमामध्ये ३३ नक्षलवाद्यांनी खाली ठेवल्या बंदुका

इतकी कोटी झाली देशातील डिमॅट खातेदारांची संख्या

१६ जुलै २०२२ रोजी दोन सदस्यीय मंत्रिमंडळाने दोन नावांच्या बदलांसाठी शासन निर्णय पारित केला आणि केंद्र सरकारकडे पाठविला.राज्य सरकारचे वकील पी.पी. काकडे यांनी सांगितले की, केंद्राचे राज्याला मंगळवारी ई-मेल द्वारे प्राप्त झाले असून हायकोर्टाने २७ फेब्रुवारीपर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले आहे. ३१ जानेवारी रोजी हायकोर्टाने राज्य सरकारला नामांतराचा निर्णय कोणत्या परिस्थितीत घेण्यात आला आणि हरकती मागवल्या का याचे स्पष्टीकरण देण्यास सांगितले होते.

Exit mobile version