महाराष्ट्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा आज तिथीनुसार जन्मदिन आहे. आज बाबासाहेब पुरंदरे १००व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्त पुण्यामध्ये त्यांचा नागरी सत्कार केला जात आहे. या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली आहे. त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून दिलेल्या शुभेच्छा विशेष लक्षवेधी ठरल्या आहेत.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहेत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
हे ही वाचा:
चला, जुन्या गाड्या लवकर भंगारात काढा!
कंदहार पडले, तालिबानची राजवट अटळ?
दोन लसी घेतलेल्यांचे ‘तिकीट कापले’
शिवशाहीरांच्या शतकी जन्मदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या सत्काराला अनेक दिग्गजांची उपस्थिती लाभली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील व्हिडिद्वारे उपस्थिती दर्शवली होती. पंतप्रधान मोदींबरोबर, सरसंघचालक मोहन भागवत, भारतरत्न सचिन तेंडुलकर, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ऑनलाइन पद्धतीने या कार्यक्रमात सहभागी झाले. त्याबरोबरच राज ठाकरे यांनी यापूर्वी बाबासाहेब पुरंदरे यांच्या तारखेनुसार येणाऱ्या जन्मदिनी त्यांची भेट घेतली होती. त्यावेळी एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाप्रसंगी बाबासाहेब पुरंदरे यांना शंभर दिव्यांनी ओवाळण्यात आले. त्यानंतर विविध मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत. त्याबरोबरच सचिन तेंडुलकर यांनी देखील शिवशाहीरांना व्हिडिओद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. अनेक मान्यवरांच्या शुभेच्छांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली.