इस्रायलने हिजबुल्लासोबतचा युद्धविराम करार स्वीकारला आहे. हा करार बुधवारी (२७ नोव्हेंबर) इस्रायली वेळेनुसार पहाटे ४ वाजल्यापासून लागू होईल. यासाठी पाच अटी ठेवण्यात आल्या आहेत. असे म्हटले जात आहे की, हा युद्धविराम सुमारे १४ महिन्यांपासून चाललेल्या युद्धाच्या समाप्तीची पायरी तयार करत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी म्हटले आहे की, इस्रायल आणि इराण समर्थित गट हिजबुल्लाह यांनी अमेरिका आणि फ्रान्स यांच्या मध्यस्थीने केलेला करार मान्य केला आहे. दरम्यान, इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविरामाचा करार झाला असला तरी गाझामधील हमासविरुद्धची कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी या कराराला ‘गुड न्यूज’ म्हटले आहे. जो बिडेन म्हणाले, “मी इस्रायल आणि लेबनॉनच्या पंतप्रधानांशी बोललो आहे आणि मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की त्यांच्या सरकारने इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यातील विनाशकारी संघर्ष संपवण्याचा युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाचा प्रस्ताव स्वीकारला आहे.”
युद्धबंदीच्या अटी:
१) करारामध्ये फक्त ६० दिवसांच्या युद्धविरामाचा उल्लेख करण्यात आला आहे, ज्याअंतर्गत हिजबुल्लाह दक्षिण लेबनॉनमधून मागे हटताच इस्रायली सैन्य देखील माघार घेईल.
२) युद्धविराम करारात लितानी नदीच्या दक्षिणेकडील भागात हजारो लेबनीज सैन्य आणि संयुक्त राष्ट्र शांततारक्षक तैनात करण्याची तरतूद आहे.
३) अमेरिकेच्या अध्यक्षतेखालील एक आंतरराष्ट्रीय गट सर्व पक्षांद्वारे अटींचे पालन करण्यावर लक्ष ठेवेल. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन म्हणाले की, या कराराचा उद्देश शत्रुत्व कायमचा संपवणे हा आहे.
४) हिजबुल्लाहने कराराचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे इस्रायलने म्हटले आहे, तर लेबनॉनने याला विरोध केला आहे. लेबनीज अधिकाऱ्यांनी या तरतुदीला करारात समाविष्ट करण्यास विरोध केला आहे.
हे ही वाचा :
दहशतवाद्यांच्या खात्म्यासाठी जम्मूमध्ये एनएसजीचे पथक कायमस्वरूपी तैनात !
संभल हिंसाचार; आरोपींचे पोस्टर लावा, बक्षीस जाहीर करा, नुकसान भरपाई वसूल करा!
बांगलादेशात साधू चिन्मय प्रभूंच्या अटकेविरोधातील निदर्शनात वकिलाचा मृत्यू!
कुस्तीपटू बजरंग पुनिया चार वर्षांसाठी निलंबित!