25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषबिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला घातपात की अपघात?

बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला घातपात की अपघात?

Google News Follow

Related

भारतीय संरक्षण दलाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातामुळे सारा देश हादरून गेला आहे. पण आता या संपूर्ण प्रकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहे. सीडीएस बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला की हा घातपाताचा काही मोठा कट होता? असा सवाल उपस्थित होताना दिसत आहे.  हा संशय निर्माण होण्यामागे कारणेही तशीच आहेत.

सीडीएस जनरल बिपिन रावत हे भारतीय वायुसेनेच्या ज्या हेलिकॉप्टर मधून प्रवास करत होते. ते हेलिकॉप्टर MI17 V5 या प्रकारचे होते. भारतीय सैन्याच्या मिलेट्री ट्रान्सपोर्टसाठी या हेलिकॉप्टरचा वापर केला जातो. भारताने रशियाकडून हे हेलिकॉप्टर विकत घेतले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन हे नुकतेच भारत दौऱ्यावर आले असून भारत आणि रशिया यांच्यात संरक्षण क्षेत्रातील महत्त्वाचे असे करार झाले आहेत. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरच या हेलिकॉप्टरला झालेला अपघात संशयाच्या भोवऱ्यात अडकलेला दिसत आहे. भारत आणि रशियाच्या वाढत्या मैत्रीमुळे चीनला मोठ्या पोटशूळ उठला आहे. त्यामुळे अशा एखाद्या नाखुश असलेल्या बड्या देशाकडून हा कट तर रचण्यात आला नाही ना? असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे.

हे ही वाचा:

सीडीएस हेलिकॉप्टर अपघात: राजनाथ सिंग संसदेत माहिती पुरवणार

सीडीएस बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर कोसळले

प्राजक्त तनपुरे किरीट सोमय्यांच्या रडारवर

…म्हणून पंतप्रधान मोदींनी थोपटली योगींची पाठ

तर समाज माध्यमांवर काही प्रत्यक्षदर्शी असा दावा करत आहेत की ज्या ठिकाणी या हेलिकॉप्टरला अपघात झाला तेथील हवामान खराब नव्हते. आकाशही मोकळे होते. तर हे हेलिकॉप्टरही डबल इंजिन प्रकारातील असल्यामुळे तांत्रिक बिघाड होणे सहजासहजी शक्य नसल्याचे सांगण्यात येत आहे. जेव्हा सीडीएस सारखी एखादी उच्च पदस्थ एक व्यक्ती प्रवास करते तेव्हा त्या हेलिकॉप्टरच्या सर्व तांत्रिक बाबींची तपासणी झालेली असणार. त्यामुळेच हा अपघात होता की घातपात करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आला? असा संशय व्यक्त केला जात आहे.

पण अद्याप या प्रकरणात कोणताही ठोस दावा करणे शक्य नाही. भारत सरकारकडून या विषयात कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह हे लोकसभेत या संबंधीची माहिती देणार आहेत. तेव्हाच या विषयात स्पष्टता येऊ शकेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा