भारताचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांचे तामिळनाडूतील कुन्नूर येथे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. अवघा देश त्यांच्या या अकाली मृत्युमुळे दुःखी झाला. ही दुर्घटना घडण्यापूर्वी त्यांनी एक संदेश भारतीय नागरिकांसाठी दिला होता. तो १२ डिसेंबरला प्रसारित झाला.
१९७१मध्ये पाकिस्तानविरुद्ध युद्धात मिळालेल्या विजयाच्या सुवर्णमहोत्सवा निमित्ताने स्वर्णीम विजय पर्व साजरे केले जाणार आहे. याबाबत हा संदेश दिला होता. त्याचे रेकॉर्डिंग करण्यात आले होते.
ही दुर्घटना घडण्याच्या आदल्या दिवशी सायंकाळी हा संदेश रेकॉर्ड करण्यात आला होता. त्यात भारतीय नागरिकांना या सुवर्णमहोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन जनरल रावत यांनी केले होते. स्वर्णीम विजयी पर्व म्हणून हा दिवस ओळखला जात आहे.
Gen Bipin Rawat’s final public message — recorded the evening before the chopper crash, it was to play this morning as part of the 1971 War victory event. pic.twitter.com/mUO2tguw8X
— Shiv Aroor (@ShivAroor) December 12, 2021
आपल्या या संदेशात रावत म्हणतात की, स्वर्णीम विजयी पर्वच्या पूर्वसंध्येस मी भारतीय लष्करातील सर्व जवानांना शुभेच्छा देतो. १९७१मध्ये भारताने जो विजय मिळविला त्याच्या ५०व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून आपण त्याचा सुवर्णमहोत्सव साजरा करत आहोत. या दिवशी ज्या जवानांनी आपले अत्युच्च बलिदान देशासाठी दिले त्यांचे स्मरण मी करतो. १२ ते १४ डिसेंबर या कालावधीत इंडिया गेटजवळ विविध कार्यक्रमांचे आयोजन या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने करण्यात येणार आहे. आपल्या शहीद झालेल्या जवानांची आठवण म्हणून उभारण्यात आलेल्या अमर जवान ज्योतीच्या जवळच आपण हे कार्यक्रम आयोजित करत आहोत, हे आपले भाग्य आहे. मी देशातील सर्व नागरिकांना या विजयी पर्व मध्ये सहभागी होण्याचे आवाहन करतो. आम्ही सगळे या वीर जवानांबद्दल अभिमान बाळगतो. चला सगळे एकत्र येऊन हे विजयी पर्व साजरे करूया!
हे ही वाचा:
शिवसेना हा नाच्यांचाच पक्ष झालेला आहे
जिथे भगवा ध्वज उखडला; तिथेच हिंदूंनी उभारला १०८ फुटी ध्वजस्तंभ
मराठी शाळा सरकारला ‘नकोशी’; इंग्रजी माध्यमाच्या शाळांना पायघड्या
‘म्हाडा’ भरती परीक्षेत दलालांचा सुळसुळाट? आव्हाड म्हणतात…
स्वर्णीम विजयी पर्वच्या पहिल्या दिवशी म्हणजे १२ डिसेंबरला हा संदेश प्रसारित करण्यात आला. या दिवशी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्लीतील इंडिया गेट येथे स्वर्णीम विजयी पर्वचे उद्घाटन केले. मात्र हा महोत्सव आपण साधेपणाने साजरा करणार आहोत, असेही राजनाथ सिंह म्हणाले. जनरल बिपिन रावत यांच्या निधनामुळे संरक्षण मंत्र्यांनी हे आवाहन केले.
ज्या जनरल बिपिन रावत यांनी हे आवाहन देशवासियांना केले, ते मात्र स्वतः या दुर्घटनेमुळे यात सामील होऊ शकले नाहीत, हे दुर्दैव अशी भावना देशवासियांकडून व्यक्त होत आहे.