सीडीएस बिपीन रावत यांचे हेलीकॉप्टर अपघातात निधन

सीडीएस बिपीन रावत यांचे हेलीकॉप्टर अपघातात निधन

तामिळनाडूच्या कुन्नुरमध्ये लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळून त्यामधून प्रवास करत असलेले देशाचे पहिले सीडीएस (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) जनरल बिपीन रावत यांचे निधन झाले आहे. भारतीय हवाई दलाने ही बातमी दिली आहे. आज दुपारी १२:४० वाजता या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस जनरल बिपीन रावत हे देखील असल्याची माहिती हवाई दलाने दिली होती. सीडीएस बिपीन रावत , त्यांची पत्नी, पायलट आणखी एक व्यक्ती त्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. या दुर्घनेत चौदा पैकी तेरा जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. जनरल रावत यांच्या पत्नी मधुलिका यांचेही या अपघातात निधन झाले आहे.

तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये ही दुर्घटना घडली. तामिळनाडूत गेल्या काही दिवसांपासून प्रचंड पाऊस सुरू आहे. त्यामुळे खराब वातावरणामुळे ही दुर्घटना झाल्याचं सांगितलं जात आहे. या हेलिकॉप्टरमधून बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीही प्रवास करत होत्या.

भारतीय हवाई दलाने जनरल रावत यांच्या कर्मचार्‍यांच्या नावांची यादी जारी केली आहे जे क्रॅश झालेल्या हेलिकॉप्टरमध्ये होते. सीडीएस जनरल रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्या व्यतिरिक्त, ब्रिगेडियर एलएस लिडर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, एनके गुरसेवक सिंग, एनके जितेंद्र कुमार, एल/एनके विवेक कुमार, एल/एनके बी साई तेजा आणि हव सतपाल हे विमानात आहेत. दुपारी १२:२० च्या सुमारास निलगिरी जिल्ह्यातील जंगलात हे हेलीकॉप्टर कोसळले.

हे ही वाचा:

मोदींनी बोलवली महत्वाची सुरक्षा विषयक बैठक

पाकिस्तानमध्ये महिलांविरुद्ध तालिबानी अत्याचार

अमरिंदर सिंग- शेखावत चर्चेत युतीवर चर्चा?

अमेरिकेपाठोपाठ ऑस्ट्रेलियाचाही चीनच्या ऑलिंपिकवर बहिष्कार

कुन्नूर हेलिकॉप्टर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवार, 8 डिसेंबर) संध्याकाळी ६:३० वाजता सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीची (CCS) बैठक त्यांच्या अधिकृत निवासस्थानी बोलावली आहे.

Exit mobile version