मध्य रेल्वेच्या सर्व स्थानकांवर आता लक्ष ठेवणार सीसीटीव्ही!

मध्य रेल्वेच्या सर्व स्थानकांवर आता लक्ष ठेवणार सीसीटीव्ही!

मध्य रेल्वेच्या लोकलमधून प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वे बोर्डाने सुखद धक्का दिला आहे. रेल्वे परिसरात चोरी आणि इतर घटनांना पायबंद घालण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रमाणे आता मध्य रेल्वेनेही पुढाकार घेतला आहे. आता मध्य रेल्वेवरही सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत.

मध्य रेल्वेने कडक सुरक्षेसाठी उपनगरीय स्थानकांवर ३ हजार १२२ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. तर गेल्यावर्षी ६०५ कॅमेरे बसवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. उपनगरीय स्थानकांवरील गर्दीत असामाजिक तत्वांवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवण्यात आली आहे.

नऊ स्थानकांच्या १२ वेगवेगळ्या ठिकाणी यामध्ये कुर्ला, ठाणे , काळवा, कल्याण, आसनगाव, शहाड, उल्हासनगर, आटगाव, आणि टिटवाळा या स्थानकांचा समावेश आहे.

मध्य रेल्वेच्या सर्व स्थानकावर व्हिडीओ देखरेख प्रणाली ( VSS) अंतर्गत, सीसीटीव्हीच्या तरतुदीनुसार रेलटेलसोबत सामजंस्य करार करण्यात आला आहे. ज्यासाठी लवकरच निविदा काढल्या जाणार आहेत. याव्यतिरिक्त, ब्लॅक स्पॉट्स ओळखले गेले आहेत. गोळीबार किंवा असुरक्षित ठिकाणी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मुंबई विभागात दररोज सरासरी ११० उपनगरीय सेवा दिल्या जातात. याशिवाय १०५ मेल एक्सप्रेस गाड्या चालवल्या जातात. रात्रीच्या गाड्यांमध्येही कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

महिला सुरक्षेसाठी विशेष पथक

महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मुंबई विभागात पाच पथके तयार करण्यात आली आहेत. तसेच महिलांच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रित कारण्यासाठी रेल्वे संरक्षण दलाच्या पथकाने ‘मेरी सहेली’ आणि ‘ स्मार्ट सहेली ‘ ही ऑपरेशन सुरु केली आहेत.

Exit mobile version