सीबीएसईचा बारावीचा निकाल आज, काय असणार वेळ?

सीबीएसईचा बारावीचा निकाल आज, काय असणार वेळ?

सीबीएसई बोर्डचा बारावीचा निकाल आज दुपारी दोन वाजता जाहीर करण्यात येणार आहे. तशी माहिती सीबीएसईने स्वतःच ट्विट करून दिली आहे. विद्यार्थ्यांना सीबीएसईच्या अधिकृत वेवसाईटवर म्हणजे cbseresults.nic.in वर हा निकाल पाहता येईल. सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षेचा निकालही लवकरच लागण्याची शक्यता असून बोर्डने अद्याप त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही.

सीबीएसईने बारावीचा निकाल तयार करण्यासाठी मूल्यांकन पद्धतीचा अवलंब केला असून त्यासाठी १३ सदस्यांच्या समितीची निर्मिती केली होती. या पॅनेलच्या वतीने मूल्यमापनाचा ३०:३०:४० असा फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे. यामध्ये दहावीच्या गुणांचे ३०, अकरावीच्या गुणांचे ३० आणि बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे ४० टक्के गुण ग्राह्य धरले जाणार आहेत.

कोरोनाच्या प्रादुर्भावाचा परिणाम दहावी आणि बारावीच्या परीक्षांवर झाला आहे. गेल्या महिन्यात, २४ जूनला सर्वोच्च न्यायालयाने सीबीएससी, सीआयसीएसई आणि देशातील सर्व राज्यांच्या शिक्षण मंडळांना बारावीच्या परीक्षांचा निकाल ३१ जुलैपूर्वी लावण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार आज दुपारी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

हे ही वाचा:

एकाच महिन्यात एयरटेलचे नुकसान तर जिओचा फायदा?

तालिबानला विनोदाचेही वावडे?

शिवशाहीर बाबासाहेबांचा अद्भूत शिवमय प्रवास आता ऑडिओ स्वरूपात

‘अजितदादा… हे म्हणजे कुठला चित्रपट बघावा हे राज कुंद्रांनी सांगण्यासारखं’

हाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज बारावीच्या निकालाची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने देशातील सर्व राज्यांच्या शिक्षण मंडळांना ३१ जुलै पर्यंत बारावीच्या परीक्षांचे निकाल लावण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार महाराष्ट्र स्टेट एज्युकेशन बोर्डाकडे आज आणि उद्याचा दिवस आहे. त्यामुळे आज बारावीच्या निकालाची तारीख जाहीर करुन उद्या निकाल लागण्याची जास्त शक्यता आहे.

Exit mobile version