नीट पेपरलीक प्रकरणी सीबीआयने आज (२७ जून) बिहारमधून पहिली अटक केली आहे. सीबीआयने पाटणा येथून मनीष प्रकाश आणि आशुतोष कुमार या दोघांना अटक केली आहे. यापूर्वी मनीष प्रकाशला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. दरम्यान, पेपरफुटीप्रकरणी चिंटू आणि मुकेश या दोन आरोपींना सीबीआयने रिमांडवर घेतले आहे. येत्या काही दिवसात या प्रकरणात अनेकांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या मनीष प्रकाश याने आशुतोष कुमारच्या मदतीने नीट परीक्षेच्या एक दिवस आधी (४ मे) बिहारच्या पाटण्यातील एका शाळेतील वसतिगृहात उमेदवारांना बसवून नीट परीक्षेचे पेपर आणि उत्तर पत्रिका दिली होती. सीबीआयने अखेर या दोघांना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.
हे ही वाचा:
आरक्षण प्रश्नासंबंधित २९ जूनला मुंबईत सर्वपक्षीय बैठक
‘कोहलीने १५० किलोचे डंबेल उचलले, म्हणजे रोहित शर्माही तेवढे उचलेल असे नाही!
नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही खासगी संस्था असल्याचे वृत्त खोटे!
मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांशी जवळीक साधण्यासाठी महिला मंत्र्यांचा ‘जादूटोणा’ !
दरम्यान, नीट परीक्षेचा पेपर लीक झाल्यानंतर याविरोधात देशभरातील विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होत आणि या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली होती. दरम्यान, दोन आरोपींना आता सीबीआयने ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात अनेकांची नावे येण्याची शक्यता आहे.