केंद्रीय तपास यंत्रणा अर्थात सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीच्या प्रमुखांचा कार्यकाळ आता वाढवण्यात येणार आहे. सध्या या दोन्ही संस्थांच्या प्रमुखांचा कार्यकाळ हा दोन वर्षांचा आहे. पण हा कार्यकाळ आता दोन वर्षांवरून पाच वर्षांपर्यंत वाढवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर रविवार, १४ नोव्हेंबर रोजी केंद्र सरकार मार्फत दोन स्वतंत्र अध्यादेश जारी करण्यात आले आहेत.
या अध्यादेशांनुसार सीबीआय आणि ईडी या दोन महत्वाच्या केंद्रीय संस्थांच्या प्रमुख पदावर दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर सेवेच्या मुदतवाढ देण्याची तरतूद करण्यात येणार आहे. या मुदतवाढीच्या प्रस्तावाला निवड समितीने मान्यता दिली, तर सीबीआय आणि ईडीच्या प्रमुखांचा कार्यकाळ वाढवता येणार आहे. हा कार्यकाळ एकावेळी एक वर्षासाठी वाढवता येईल.
हे ही वाचा:
‘महाआघाडी आणि रझा अकादमीच्या नेत्यांना ठाकरे पवार सरकारकडून अटक का नाही?
कुणाकडून लाच तर घेतली गेली नाही ना, पंतप्रधानांनी विचारला प्रश्न…काय आहे प्रकरण?
आता मोबाईलवरून साजरा करा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
त्रिपुरात कोणत्याही मशीदिची तोडफोड, नुकसान झालेच नाही
दिल्ली स्पेशल पोलिस एस्टॅब्लिशमेंट कायदा, १९४६ मध्ये सुधारणा करणाऱ्या अध्यादेशाद्वारे हा बदल करण्यात आला आहे. अशाच अन्य एका अध्यादेशामध्ये, केंद्रीय दक्षता आयोग कायदा, २००३ मध्ये सुधारणा करून ईडी प्रमुखांच्या कार्यकाळात पाच वर्षांनी सुधारणा करण्यात आली आहे. या अंतर्गत वर्षातून एकदाच हा कार्यकाळ वाढवता येणार आहे. त्यामुळे सध्याच्या सीबीआय आणि ईडी प्रमुखांचा कार्यकाळ वाढवणे शक्य होणार आहे. सध्या सुबोध जयस्वाल हे सीबीआयचे प्रमुख आहेत. तर संजय मिश्रा हे ईडीचे प्रमुख आहेत.