27 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरविशेषसीबीआयप्रमुखांचे हिमाचल प्रदेश ‘कनेक्शन’

सीबीआयप्रमुखांचे हिमाचल प्रदेश ‘कनेक्शन’

यापूर्वी अश्वनी कुमार यांचाही हिमाचल प्रदेशशी नाते होते.

Google News Follow

Related

सीबीआयचे संचालक म्हणून कर्नाटकचे पोलिस महासंचालक प्रवीण सूद यांची निवड करण्यात आली आहे. आयपीएस अधिकारी असणारे सूद हे हिमाचल प्रदेशच्या कांगडामधील गरली परागपूरचे आहेत. मात्र वडिलांच्या नोकरीमुळे ते खूप वर्षांपूर्वी दिल्लीत स्थायिक झाले. त्यांचे शिक्षणही दिल्लीमध्येच झाले आहे.

प्रवीण सूद हे १९८६च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड व लोकसभेचे विरोधी पक्षनेते अधीररंजन चौधरी यांच्या समितीने त्यांची निवड केली. सूद यांनी आयआयटी दिल्लीमधून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये बीटेक व पीपीजीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले आहे. सूद यांचा जन्म २२ मे १९६४ रोजी झाला होता. त्यांनी पोलिस दलात विविध पदांवर काम केले आहे. तर, प्रवीण सूद यांच्या मुलीचा विवाह क्रिकेटपटू मयांक अग्रवाल यांच्याशी झाला आहे.

हे ही वाचा:

जयंत पाटलांना ईडीकडून दुसरं समन्स

‘द केरळ स्टोरी’मधील अभिनेत्री अदा शर्माचा अपघात

कर्नाटकात उपमुख्यमंत्री आणि पाच मंत्रीपदे मुस्लिमांना द्या

भारत वि. ऑस्ट्रेलिया जागतिक कसोटी चॅम्पियनशिपपासून आयसीसीकडून ‘हे’ तीन नवे नियम लागू

सूद यांनी १९८९मध्ये साहाय्यक पोलिस अधिक्षकापासून स्वत:च्या पोलिस सेवेतील करीअरची सुरुवात केली. ते २००४ ते २००७ या कालावधीत म्हैसूरचे पोलिस आयुक्तही होते. या कार्यकाळात त्यांनी पाकिस्तानी मूळ असलेल्या दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. सूद यांना पोलिस सेवेतील उत्कृष्ट कामगिरीमुळे १९९६मध्ये मुख्यमंत्री सुवर्ण पदक, २००२मध्ये पोलिस पदक व २०११मध्ये विशिष्ट सेवांसाठी राष्ट्रपती पोलिस पदकानेही सन्मानित करण्यात आले आहे.

 

ते १ मे २०२०पासून कर्नाटकचे पोलिस महासंचालक आहेत. सीबीआयच्या इतिहासात संचालकपदी आयपीएस अधिकाऱ्याची निवड होण्याची ही दुसरी वेळ आहे. याधी अश्वनी कुमार यांची संचालकपदी नियुक्ती झाली होती. ते हिमाचल प्रदेश कॅडरचे अधिकारी होते. त्यानंतर सूद हे दुसरे आयपीएस अधिकारी आहेत. मात्र ते कर्नाटक कॅडरचे आहेत.
सीबीआयला सध्या एकूणच विविध समस्यांशी सामना करावा लागत असताना सूद यांची नियुक्ती संचालकपदी झाली आहे. त्यामुळे सूद हे कितपत प्रभावी कामगिरी करतील, याकडे तमाम देशवासींचे लक्ष लागले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा