लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने पक्षाची खाती गोठवल्याचा दावा केला होता.यानंतर केरळ काँग्रेस प्रदेश कमिटी (KPCC) ने निवडणूक प्रचारासाठी निधी गोळा करण्याचा एक नवीन मार्ग शोधला आहे. पक्षाचे नेते हातात बादल्या घेऊन रस्त्यावर उतरले आणि त्यांनी क्राउडफंडिंग केले. केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीचे (केपीसीसी) कार्यवाहक अध्यक्ष एमएम हसन यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले आहे.
एका व्हिडिओमध्ये केपीसीसीचे कार्यवाहक अध्यक्ष एमएम हसन हे तिरुअनंतपुरममधील दुकानांमध्ये बादली घेऊन पैसे मागण्यासाठी जाताना दिसत आहेत. हा पैसा लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील निवडणूक प्रचारासाठी वापरला जाईल, असा दावा त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने काँग्रेस पक्षाची बँक खाती गोठवली असल्याचा आरोप करून हसन म्हणाले, “केपीसीसी आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने (एआयसीसी) सामान्य लोकांशी संपर्क साधून निवडणुकीसाठी त्यांचा पाठिंबा मिळविण्याचे ठरवले आहे.
हे ही वाचा:
काँग्रेसचा जाहीरनामा पाक निवडणुकीसाठी अधिक अनुकूल!
जेपी नड्डा यांच्या पत्नीची कार बनारसमधून जप्त!
गुजरात विद्यापीठ नमाज प्रकरण:७ अफगाण विद्यार्थ्यांना वसतिगृह सोडण्याचे आदेश!
तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर स्टॅलिन यांनी दिली दोन मिनिटांची मुलाखत!
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले, “आज मी आणि आमचे कार्यकर्ते स्थानिक कार्यकर्त्यांच्या निवडणुकीच्या कामाच्या खर्चासाठी रस्त्यावर उतरणार आहोत.” काँग्रेस पक्षाने १६ फेब्रुवारी रोजी सांगितले होते की, लोकसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या वादाच्या संदर्भात २१० कोटी रुपयांच्या प्राप्तिकराच्या मागणीवरून त्यांची बँक खाती गोठवण्यात आली होती. तथापि, पक्षाला २१ फेब्रुवारीपर्यंत अंशतः खाती चालविण्यास परवानगी देण्यात आली होती.