31 C
Mumbai
Tuesday, November 26, 2024
घरविशेषसीएसएमटी रेल्वे स्थानकातुन ६० लाख रुपयांची रोकड जप्त!

सीएसएमटी रेल्वे स्थानकातुन ६० लाख रुपयांची रोकड जप्त!

पोलिसांकडून तपास सुरू

Google News Follow

Related

नागपूर येथून सीएसएमटी येथे आलेल्या दुरांतो एक्सप्रेसच्या पार्सल डब्ब्यात रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना आढळून आलेल्या दोन संशयित पार्सल मध्ये ६० लाख रुपयांची रोकड मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे पैशांचे पार्सल कोणी पाठवले आणि मुंबईत कुणाकडे जाणार होते याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. ही रोकड हवाल्याची असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे लोहमार्ग पोलिसांकडून लांबपल्ल्याच्या गाड्याची मोठ्या प्रमाणात तपासणी सुरू आहे. मंगळवारी रेल्वे सुरक्षा बल यांच्याकडून तपासणी सुरू होती. दरम्यान मंगळवारी सायकली नागपूर येथून आलेली दुरांतो एक्सप्रेसची तपासणी सुरू असताना रेल्वे सुरक्षा बलाला नागपूर आलेल्या पार्सल दोन संशयित बॅगा आढळून आल्या, रेल्वे सुरक्षा बलाने हे पार्सल तपासले असता एका बॅग मध्ये ४० लाख आणि एका बॅग मध्ये २० लाख रुपये आढळून आले.

हे ही वाचा:

भाजप पक्षाचे खोटे पत्र तयार करून उमेदवार जाहीर करण्यात आल्याचा खोडसाळपणा!

२०१४ मध्ये आशा, २०१९ मध्ये विश्वास अन २०२४ मध्ये मोदींची ‘गँरंटी’

अहमदाबाद-वडोदरा एक्स्प्रेस वेवर कारची ट्रकला धडक, १० जण ठार!

मतदानाच्या दिवशी कूचबिहारला भेट देऊ नका!

हे पार्सल निनावी असल्यामुळे रेल्वे सुरक्षा बलाने ते ताब्यात घेऊन त्याची रीतसर नोंद करून आयकर विभागाला सूचना देण्यात आली आहे.ही रोकड नागपूर दुरांतो एक्सप्रेस मधून आल्यामुळे हे पार्सलकोणाला देण्यात येणार होते याबाबत तपास सुरू आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही रोकड हवाला प्रकरणातील असण्याची शक्यता असू शकते अथवा अंगाडीया कुरियरची असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
198,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा