राज्यसभेत काँग्रेसचे खासदार अभिषेक मनू सिंघवी यांच्या बाकाखाली नोटांचे बंडल सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. तपासणी दरम्यान नोटांचे बंडल सापडल्याची माहिती सभापतींनी सभागृहाला दिली. मिळालेल्या माहितीनुसार, सापडलेल्या बंडलमध्ये ५० हजार रुपये होते. संसदेच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी रोख रक्कम जप्त केली आहे. दरम्यान, सभापती धनखर यांनी केलेल्या दाव्यामुळे काँग्रेस खासदारांनी विरोध केला, मल्लिकार्जुन खर्गे यांनी तपासापूर्वी नावे घेऊ नयेत यावर जोर दिला.
सभापती धनखर यांनी माहिती देताना म्हटले, कामकाज तहकूब केल्यानंतर काल नियमित तपासणी दरम्यान २२२ नंबरच्या बाकाखाली नोटांचे बंडल सापडले. २२२ हा बाक हा अभिषेक मनू सिंघवी यांचा आहे. ही बाब अत्यंत गंभीर असुन चौकशी सुरु आहे, असे सभापतींनी सांगितले. सभापतींनी ही माहिती दिल्यानंतर सभागृहात एकच गोंधळ पाहायला मिळाला.
हे ही वाचा :
विक्रमवीर आमदार कालिदास कोळंबकर विधानसभेचे हंगामी अध्यक्ष!
शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर
ठाकरेंचा कडेलोट नेमका कोणामुळे झाला…
२०१९-२०२२ मध्ये संधी हुकली, पण यंदा जनतेने फडणवीसांना अविश्वसनीय बहुमत दिलं!
दरम्यान, खासदार अभिषेक मनू सिंघवी यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले, “मी राज्यसभेत जाताना फक्त ५०० रुपयांची नोट घेऊन जातो. मी पहिल्यांदाच याबद्दल ऐकले. मी दुपारी १२.५७ वाजता सभागृहात पोहोचलो आणि दुपारी १ वाजता सभागृहातून निघालो. त्यानंतर, मी दुपारी १.३० पर्यंत कॅन्टीनमध्ये बसलो आणि त्यानंतर मीस संसदेतून बाहेर पडलो.
या प्रकरणावर मल्लिकार्जुन खर्गे यांनी देखील संताप व्यक्त केला. “या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे तुम्ही सांगितले. जोपर्यंत ते सिद्ध होत नाही, तो पर्यंत नाव नाव घेऊ नये, असे खर्गे म्हणाले.