सत्तेत आल्यापासून निर्णयांचा धडाका लावलेल्या शिंदे- फडणवीस सरकारने आणखी एक दिलासा देणारा निर्णय घेतला असून यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना मोठा दिलासा मिळणार आहे. या उत्सवादरम्यान दाखल करण्यात आलेले गुन्हे लवकरच मागे घेण्यात येणार आहेत. गुन्ह्यांचे स्वरूप पाहून त्यानुसार निर्णय घेण्यात येणार असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे.
गणेशोत्सवात आणि दहीहंडी उत्सवात कायदेशीर सूचनांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत. गणेशोत्सव आणि दहीहंडीच्या काळात कायदेशीर सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत. ज्यांनी ५ लाखांपेक्षा कमी नुकसान केलं असेल अशा खटल्यांबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रासाठी पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली तर जिल्हा स्तरावर जिल्हा अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आलेली समिती गुन्ह्यांचे स्वरूप तपासून निर्णय घेणार आहे. तसेच ३१ मार्च २०२२ पूर्वी दोषारोपपत्र दाखल झालेल्या खटल्यांसाठी हा निर्णय असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
ती बोट इंजिन बंद पडल्याने भरकटली आणि हरिहरेश्वरला आली
भरपावसाळ्यात गटारावरील झाकणे चोरणाऱ्याला अटक
‘भाजपाच्या मतांवर निवडून यायचे आणि उगाच म्हणायचे आमचा गड’
‘मी ख्रिश्चन आहे, मी तिरंग्याला सलाम करणार नाही’
दरम्यान, गोविंदांची मागणी होती की या उत्सवाचा साहसी खेळ म्हणून समावेश व्हावा. म्हणून या गोविंदा उत्सवाचा क्रीडाप्रकारात समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच दहीहंडीदरम्यान एखाद्या गोविंदाचा मृत्यू झाला तर शासनाकडून १० लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. तर गोविंदा जबर जखमी झाला तर ७.५० लाख आणि त्याच्या अवयवाला गंभीर इजा झाली तर ५ लाख रुपये सरकारकडून देण्यात येणार आहेत.