लोकसभा निवडणुकीला अवघे काही तास उरलेले असताना ईशान्य मुंबईमध्ये राजकीय वातावरण तापले आहे.भाजपा उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या निवडणूक वॉर रूम येथे शिवसेना उबाठा उमेदवार संजय दिना पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी रात्री राडा घातला, या प्रकरणी मुलुंड पोलीसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी शिवसेना उबाठा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
निवडणूक वॉर रूमची तोडफोड उबाठाचे उमेदवार संजय पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केल्याचा आरोप भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांनी केला आहे. कोटेचा यांनी पाटील यांच्यावर आरोप करण्याची ही पहिलीच घटना नाही. गेल्या आठवड्यात कोटेचा यांनी मानखुर्दजवळ त्यांच्या रोड शोवर दगडफेक केल्याचा आरोप केला आणि त्याआधी त्यांचा निवडणूक रथ फोडला गेल्याचा आरोप कोटेचा यांनी केला होता.शिवसेना उबाठा पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार कोटेचा यांच्या कार्यालयातून पैसे वाटले जात होते म्हणून त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली. मात्र कोटेचा यांनी पैसे वाटल्याचा आरोप फेटाळून लावला.
मुलुंडमध्ये घडलेली घटना….
कोटेचा हे शुक्रवारी दादर शिवाजी पार्क येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या सभेत सहभागी होत असताना ही घटना घडली. परिस्थिती जाणून घेतल्यानंतर, कोटेचा यांनी माध्यमांशी संवाद साधला, आरोपांचे खंडन केले आणि शिवसेना यूबीटी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या कृतीचा निषेध केला.
काल आम्ही शिवाजी पार्क येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला उपस्थित राहण्यात व्यस्त होतो. तुमच्या कार्यकर्ता मुश्ताक खान आणि त्याच्या साथीदारांनी माझ्या निवडणूक कार्यालयावर हल्ला करून माझ्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. आज मी निवडून आल्यावर शपथ घेतो. मानखुर्द परिसरातील ड्रग्ज, मटका, गुटखा असे तुमचे सर्व अवैध धंदे मी बंद करीन. मानखुर्द परिसराचे नाव बदलून ते छत्रपती शिवाजी महाराज नगर असे ठेवीन असे कोटेचा यांनी प्रसारित केलेल्या व्हिडीओत म्हटले आहे.तोंडफोडीच्या घटनेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार प्रसाद लाड यांनी कोटेचा यांच्या तोडफोड झालेल्या निवडणूक वॉर रूमला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
फडणवीस यांनी या हल्ल्याचा निषेध केला , “अशा प्रकारच्या हल्ल्यांचा निषेध केला पाहिजे. दुसऱ्या बाजूने आमच्या महिला कर्मचाऱ्यांवरही हल्ला केला, जो मान्य नाही. ही शिवाजी महाराजांची संस्कृती किंवा शिकवण नाही. शिवसेना यूबीटीला ही निवडणूक हरवणार आहे, हे अगदी स्पष्ट आहे; त्यामुळे ते असे डावपेच वापरत आहेत. अशी तोडफोड आम्ही मान्य करणार नाही,” असे लाड यांनी पत्रकारांशी बोलतांना म्हणाले.
हेही वाचा :
गाझामधून तीन ओलिसांचे मृतदेह ताब्यात
‘आप’मधील वातावरण ‘गैरवर्तन’, ‘गुंडगिरी’चे असून ‘ब्लॅकमेल संस्कृती’ने काम सुरू
स्वाती मालीवाल यांना मारहाण प्रकरणी पोलिसांनी बिभव कुमारच्या मुसक्या आवळल्या
किर्गिस्तानमधील हिंसाचारात भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थी लक्ष्य
परिमंडळ ७ चे पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी तोडफोडीच्या ठिकाणी भेट दिली आणि आरोप आणि त्यानंतर झालेल्या तोडफोडी बाबत माध्यमांशी संवाद साधला. भाजपकडून मतांसाठी पैसे वाटले जात असल्याचा दावा शिवसेनेच्या उबाठा गटाने केल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, निवडणूक आयोगाने केलेल्या तपासणीत या आरोपांमध्ये तथ्य आढळून आले नाही. “परिस्थिती नियंत्रणात आहे आणि परिसरातील तणाव कमी झाला आहे,” असे कराड म्हणाले. या सर्व घटनेनंतर शनिवारी मुलुंड पोलिसांनी तोडफोड करून सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, सरकारी कर्मचाऱ्यावर हात उचलणे, धमकी दिल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.