भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईतील गोवंडी परिसरातील ७२ मशिदींमध्ये अनधिकृतपणे लावण्यात आलेल्या भोंग्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर युसुफ अन्सारी नावाच्या व्यक्तीकडून त्यांना धमकी देण्यात आली होती. फेसबुकवरून ही धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी अखेर युसुफ अन्सारी विरोधात शिवाजी नगर गोवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरीट सोमय्या यांनी ट्वीटकरत याची माहिती दिली.
अन्सारी याने फेसबुकवरून किरीट सोमय्या यांना धमकी देत ८ एप्रिल रोजी त्यांच्या घरी जाऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्याने एक व्हिडीओ पोस्ट करत म्हटले, किरीट सोमय्या यांचा पत्ता शोधून काढणार आणि आंदोलन करणार. कॉलर पकडून बाहेर काढणार. शिवाय गोवंडीमधील मुस्लिमांना त्याने आवाहन केले आहे की, मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी पोलीस आले किंवा आवाज कमी करण्यास सांगितले तर मला संपर्क करा. कोणीही येतं काहीही बोलतं आणि आपण ते पाळायचं का? हा हिंदुस्तान आहे, डॉ. बाबासाहेबांच्या संविधानानुसार देश चालणार, असा इशारा त्याने दिला होता.
यावर किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केले की, त्यांची भूमिका स्पष्ट असून ते अशा गुंडांना घाबरत नाहीत. अनधिकृत भोंगे आणि मशिदींवर कारवाई होणारचं. किरीट सोमय्या पुढे म्हणाले की, शिवाजी नगर, गोवंडी पोलिस ठाण्याने अधिकृत दिलेल्या आकडेवारीनुसार ७२ मशिदी आहेत. या प्रत्येक मशीदीवर पाच ते सहा भोंगे आहेत. म्हणजे एकट्या शिवाजी नगर, गोवंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ४०० अनधिकृत भोंगे आहेत. मुलुंड, घाटकोपर, विक्रोळी, भांडूप येथील ८० टक्के मशिदींनी भोंग्यासाठी परवानगी घेतलेली नाही. मुंबई शहरात चार हजार अनधिकृत भोंगे आहेत.
हे ही वाचा :
…तर पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीचा पर्याय
४८ तासांच्या आत वक्फ कायदा रद्द करू!
‘हिंदूंची कत्तल होतेय आणि खासदार युसूफ पठाण चहाचा आनंद घेतोय!’
८५० बैल आणि ३५० बुलफायटर्सचा पराक्रम बघा
दरम्यान, मुस्लीम समाजाला भडकविणे आणि धमकी प्रकरणी युसुफ अन्सारी विरोधात तक्रार झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम १९६(१)(a), १९६(१)(b), ३५१(२) अंतर्गत युसुफ अन्सारी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
युसुफ अन्सारीचा विरोधात
"किरीट सोमैयाना मारण्याची" धमकी दिल्या बदल…
शिवाजी नगर गोवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
FIR No. 261 दिनांक 12/04/2025
भारतीय न्याय संहिता BNS कलम
196(1)(a), 196(1)(b), 351(2)
FIR तक्रारीचे मुद्दे…
"माजी खासदार श्री किरीट सोमैया यांनी माहिती… pic.twitter.com/FD1aYPCM0x
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) April 13, 2025