शिवाजी पार्क या ठिकाणी असलेल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर शिवसेनेच्या दोन्ही गटात गुरुवारी रात्री झालेल्या राड्यानंतर पोलिसांनी ५० ते ६० अज्ञात शिवसैनिकांवर दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. महत्वाचे म्हणजे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणाऱ्या दोन्ही गटातील एकही शिवसैनिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आलेला नाही. पोलिसांनीच या घटनेची दखल घेऊन सरकारच्या वतीने गुन्हा दाखल केला आहे.
दादर शिवाजी पार्क या ठिकाणी असलेल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर बाळासाहेबाच्या स्मृती दिनाच्या पूर्वसंध्येला स्मृतीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी शिवसेनेचे दोन्ही गट जमले होते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला वंदन करून तेथून गेल्यानंतर दोन्ही गट स्मृतीस्थळावर आमनेसामने आला दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध घोषणा सुरू केल्यानंतर तेथील वातावरण तापले आणि दोन्ही गटात संघर्ष निर्माण होऊन दोन्ही गट भिडले.
घटनास्थळी दाखल असलेल्या पोलिसांनी तात्काळ दोन्ही गटाच्या शिवसैनिकांना स्मृती स्थळवरून बाहेर काढल्यानंतर दोन्ही गट शिवाजी पार्क परिसरात पुन्हा भिडले, पोलिसानी दोन्ही गटांना तेथून जाण्याचे आवाहन करून दोन्ही गटाच्या नेत्यांची समजूत काढून शिवसैनिकांना पांगविण्यात आले, पोलिसानी परिस्थिती सांभाळल्या नंतर दोन्ही गटाच्या नेत्यांनी प्रसार माध्यमांसमोर आले व दोन्ही गटांच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू केला.दरम्यान पुन्हा परिस्थिती बिघडू नये म्हणून पोलिसांकडून शिवाजी पार्क परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला.
हे ही वाचा:
दिवाळीनंतरच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे महत्त्वाचे निर्णय
श्रीलंका सरकारकडून बीसीसीआय सचिव जय शहांची माफी
‘ऑपरेशन काली’ अंतर्गत पाच दहशतवाद्यांचा खात्मा
एकमेकांवर आरोप करणारे दोन्ही गटाचे एकही नेता किंवा शिवसैनिक गुरुवारी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले नाही, दरम्यान शिवाजी पार्क पोलिसांनी शुक्रवारी याप्रकरणी ५०ते ६० अज्ञात शिवसैनिका विरुद्ध दंगल माजविणे, मुंबई पोलीस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही आणि वृत्त वाहिनीच्या कॅमेरात कैद झालेल्या या राड्यातील दृश्यावरून पोलीस तपास करून आरोपीची ओळख पटविण्याचे काम करीत असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस आधिकरी यांनी दिली.