उत्तर प्रदेश पोलिसांनी समाजवादी पक्षाचे (एसपी) नेते मेहबूब अली यांच्यावर जाहीर सभेत प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. यूपीमधील अमरोहा मतदारसंघातील आमदार अली यांनी रविवारी २९ सप्टेंबर रोजी असा इशारा दिला की भारतात मुस्लिम लोकसंख्या वाढत आहे आणि २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपची सत्ता संपुष्टात येईल.
मुघलांनी ८०० वर्षे देशावर राज्य केले. त्यांची सत्ताही संपुष्टात आली तर तुम्ही (भाजप) किती दिवस टिकणार? तुम्ही नक्कीच नाहीसे व्हाल आणि आम्ही सत्तेवर येऊ,’ अशी धमकी त्यांनी दिली होती. गंमत म्हणजे, ‘संविधान मान दिवस’ या कार्यक्रमात समाजवादी पक्षाच्या नेत्याने प्रक्षोभक टिप्पणी केली. त्यानंतर मेहबूब अली यांच्यावर कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
हेही वाचा..
केवढे हे अराजक ? आयएएस अधिकाऱ्याची पत्नीच प. बंगालमध्ये सुरक्षित नाही!
माओवाद्यांशी संबंध असलेल्या प. बंगालमधील १२ ठिकाणांवर छापेमारी
रशिद सिद्दिकी बनला शंकर शर्मा अन आयेशा बनली आशा; १० वर्षे भारतात होते वास्तव्याला
अभिनेता गोविंदाला स्वतःच्याच बंदुकीतून लागली गोळी
उपनिरीक्षक संजीव कुमार यांनी या घटनेला पुष्टी दिली आहे. त्यांनी सांगितले की, अली आणि एसपी (बिजनौर) प्रमुख झाकीर हुसेन यांच्याविरुद्ध प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवण्यात आला आहे. २०१२ पर्यंत मेहबूब अलीवर दरोडा, अपहरण आणि खुनाचा प्रयत्न असे १५ गुन्हे दाखल होते. ४ वर्षांनंतर त्याच्यावर शौकत पाशा नावाच्या व्यक्तीच्या हत्येचा आरोप ठेवण्यात आला.
या घटनेमुळे मलिक आणि तुर्क मुस्लिम समुदायांमध्ये तणाव निर्माण झाला आणि २०१७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षावर बहिष्कार टाकण्यास प्रवृत्त केले.