थकित जीएसटी भरण्यावरून आयुक्तांनी मागितली १ कोटींची लाच

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पाच जणांविरुद्ध गुन्हा

थकित जीएसटी भरण्यावरून आयुक्तांनी मागितली १ कोटींची लाच

एका पेट्रोकेमिकल कंपनी कंपनीच्या संचालकाकडे थकीत जीएसटी भरणा संदर्भात अटक करण्याची भीती घालून एक कोटी रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी सहाय्यक राज्यकर आयुक्त अर्जुन सूर्यवंशी यांच्यासह ५ जणांविरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवीमुंबई येथील मे.धीरज पेट्रोकेमिकल्स अँड गॅस प्रा.लिमिटेड या कंपनीने दोन व्यापाऱ्याकडून माल खरेदी करून वेळेत जीएसटी भरणा केली नसल्याची नोटीस जीएसटी विभागाकडून कंपनीचे संचालक धीरज पांडे यांना नोटीस बजावण्यात आली होती. दरम्यान २५जुलै २०२३ रोजी राज्यकर सहाय्यक आयुक्त अर्जुन सूर्यवंशी यांनी पथकासह धीरज पांडे यांच्या घरी छापेमारी करण्यात आली होती.

हे ही वाचा:

ब्रिटनचे राजे किंग चार्ल्स तृतीय यांना कर्करोग

आता कोकणात जाण्यासाठी रिझर्व्हेशन नको!

सर्दी-खोकल्यासाठी सर्रास दिल्या जाणाऱ्या औषधांच्या पुनर्तपासणीचे निर्देश

अरविंद केजरीवालांच्या पीएसह आप नेत्यांच्या घरावर ईडीचे छापे!

या छाप्यादरम्यान पांडे यांना पाच कोटी रुपयांचा जीएसटी भरणा केली नसल्यामुळे त्यांना अटक होऊ शकते अशी भीती घालून पांडे यांच्याकडे हे प्रकरण पाच वर्षे पुढे लांबविण्यासाठी जीएसटी अधिकारी यांनी १ कोटी रुपयांची मागणी करून २५ लाखाचे दोन हफ्ते रोख आणि ५० लाख रुपयांचे सोनं अशी लाचेची मागणी केली.

पेट्रोकेमिकल कंपनीने या प्रकरणी जीएसटी आयुक्तलयात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केल्यानंतर हे प्रकरण लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोपविण्यात आले होते. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासात लाच मागितल्याने पुरावे आढळून आल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने याप्रकरणी सहाय्यक राज्यकर आयुक्त अर्जुन सूर्यवंशी यांच्यासह ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version