30 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरविशेषबीकेसी पूल दुर्घटनेसंबंधी कंत्राटदारावर अखेर गुन्हा

बीकेसी पूल दुर्घटनेसंबंधी कंत्राटदारावर अखेर गुन्हा

Google News Follow

Related

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे उड्डाणपूलाचे काम सुरू असताना शुक्रवारी (१७ सप्टेंबर) पहाटे उड्डाणपुलाचा भाग कोसळून या दुर्घटनेत १४ कामगार जखमी झाल्याच्या एक दिवसानंतर बीकेसी पोलिसांनी शनिवारी (१८ सप्टेंबर) या प्रकरणी एफआयआर नोंदवला.

कंत्राटदार जे. कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड आणि प्रकल्प प्रभारी यांच्यावर ३३६, ३३७ आणि ३३८ या कलमांतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. संबंधित अधिकारी आणि कामगारांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. आम्ही आयआयटी- मुंबई आणि व्हीजेटीआयच्या चौकशीच्या अहवालाची वाट पाहत आहोत, ज्यातून नेमके कोण जबाबदार आहे याची स्पष्टता येईल, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

हे ही वाचा:

५० लाखांची मदत द्या! उत्कर्ष बोबडे यांच्या कुटुंबियांची मागणी

पंजाबमध्ये ‘पंजा’चा गोंधळ सुरूच! सुखजिंदर रंधावांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत

एसटी महामंडळातील सचिन वाझे कोण?

उल्हासनगर कायदा-सुव्यवस्थेच्या नावाने उल्हास…घडली आणखी एक घटना!

शनिवारी चौकशी पथकाच्या सदस्यांनी घटनास्थळी पाहणी केली असता, कोसळलेले बांधकाम काढण्याचे काम सुरू होते. या प्रकल्पासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) जे. कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडला कंत्राटदार म्हणून नियुक्त केले होते. एका अधिकाऱ्याने सांगितले की, गर्डरचा ६५- मीटर लांब आणि ८.५- मीटर रुंद भाग एका बाजूला झुकला गेला आणि या दुर्घटनेत कामावर असलेले २४ पैकी १४ कामगार जखमी झाले आहेत.

बीकेसीच्या मुख्य रस्त्याला जोडणारा सांताक्रूझ- चेंबूर लिंक रोडचे बांधकाम सुरू आहे. शुक्रवारी पहाटे ४च्या दरम्यान बांधकाम सुरू असलेल्या या पुलाचा काही भाग कोसळला. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या व मुंबई पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीविहानी झाली नाही. मात्र, हा उड्डाणपूल कसा कोसळला, याचे कारण अद्याप समजू शकले नाहीये.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा