शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार राजन प्रभाकर साळवी यांच्या अडचणीत आणखीच वाढ निर्माण झाली आहे.राजन साळवी यांच्याविरोधात रत्नागिरी एसीबी कार्यालयातून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजापूरचे आमदार राजन साळवी आणि त्यांची पत्नी अनुजा साळवी, मुलगा शुभम साळवी यांच्या विरोधात उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता प्रकरणी त्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रत्नागिरी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राजन साळवी यांच्याकडे ऑक्टोबर २००९ ते ०२/१२/२०२२ या कालावधीमध्ये ज्ञात उत्पन्नापेक्षा जास्त एकूण ३,५३,८९,७५२/- रुपये इतकी म्हणजेच ११८.९६% संपत्ती जास्त असल्याचा आरोप साळवी यांच्यावर करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
भारत जोडो न्याय यात्रेचं अखिलेश यादवांना आमंत्रण नाही; स्वतःची पदयात्रा सुरू करणार
आदिवासी विकास विभाग कार्यालयाबाहेर आंदोलन, आत साहेबांचा ‘बड्डे’!
राम भक्ताची होणार संकल्पपूर्ती; राम मंदिरासाठी ३१ वर्षांपासून आहेत अनवाणी
रामलल्लाची मूर्ती अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहात दाखल
या बेकायदा संपत्ती बाबत साळवी यांना समाधानकारक खुलासा सादर करता आला नाही.तसेच ही संपत्ती बेकायदा आहे हे राजन साळवी यांच्या पत्नी आणि मुलास माहित असूनही त्यांनी स्वतःच्या नावे ही मालमत्ता केली.राजन साळवी यांना गुन्हा करण्यास प्रोत्साहन दिल्याप्रकरणी साळवी यांची पत्नी आणि मुलगा असा तिघांविरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आज दिनांक १८.१.२०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास रत्नागिरी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुशांत चव्हाण करीत आहेत.
त्या अनुषंगाने आमदार श्री राजन साळवी यांचे घर हॉटेल कार्यालय व इतर सात संबंधित ठिकाणी एकाच वेळी लाच लुचपत प्रतिबंधक विभागामार्फत घराची झडती सुरू करण्यात आली आहे.ही कारवाई एसीबी ठाणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक सुनिल लोखंडे,अप्पर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर,अप्पर पोलीस अधीक्षक सुधाकर सुराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सुशांत चव्हाण यांच्या पथकामार्फत करण्यात येत आहे.