तृणमूल काँग्रेस (टीएमसी) खासदार महुआ मोईत्रा यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या (NCW) प्रमुख रेखा शर्मा यांच्याविरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल महुआ मोईत्रा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एनसीडब्लू प्रमुखांवर अपशब्द वापरल्याप्रकरणी महिला आयोगाने शुक्रवारी दिल्ली पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर महुआ मोईत्रा यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या आयएफएसओ (IFSO) सायबर युनिटने हा एफआयआर नोंदवला आहे. आयएफएसओ युनिट आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून महुआ मोईत्रा यांच्या टिप्पणीचा तपशील घेणार आहे, ज्यामध्ये त्यांनी रेखा शर्मा यांच्या विरोधात अपमानास्पद भाषा वापरली गेली होती. त्यानंतर या प्रकरणाचा अधिक तपास केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले. महुआ मोईत्रा विरोधात बीएनएस कलम ७९ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
‘मलाही विश्वचषक विजेत्यांसारखा सन्मान हवा!..’
आशिया चषकासाठी महिला टीम इंडियाची घोषणा; हरमनप्रीत कौरची कर्णधारपदी निवड
‘राजकीय दबावाला बळी पडू नका, योग्य कारवाई करा’
फॉर फ्युचर इंडिया संस्थेचे ३०० वे स्वच्छता अभियान
काय प्रकरण आहे?
वास्तविक, हातरस चेंगराचेंगरीनंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा घटनास्थळी गेल्या होत्या. महुआ मोइत्रा यांनी यासंदर्भातील त्यांच्या एका व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. यावर भाजपने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत टीएमसी खासदारावर जोरदार हल्ला चढवला. याला राष्ट्रीय महिला आयोगाकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. त्यानंतर महुआ मोईत्राविरुद्ध पोलिसांकडे रीतसर तक्रार देण्यात आली. आता दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर कारवाई करत एफआयआर नोंदवला आहे.