पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये वक्फ कायद्याविरुद्धच्या निदर्शनांना हिंसक वळण लागल्याने तणाव निर्माण झाला. या कायद्याविरुद्ध निदर्शने करण्यासाठी मोठा जमाव जमला होता तेव्हा निदर्शक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला. यावेळी निदर्शकांनी दगडफेकही केली. याशिवाय अनेक वाहनांना आग लावण्यात आली. या घटनेवर भाजपाने ममता सरकारवर टीका केली आणि मुस्लिम तुष्टीकरणामुळे बंगाल बांगलादेश बनत असल्याचे म्हटले.
वक्फ दुरुस्ती विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर त्याच्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्यानंतर त्याचे कायद्यात रुपांतर झाले. तथापि, या कायद्याविरोधात देशभरातील मुस्लिम समुदायाकडून निदर्शने केली जात आहेत. याच दरम्यान आज (८ एप्रिल) मुर्शिदाबादच्या जांगीपूरमध्ये आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिस आंदोलकांना रोखण्यासाठी गेले तेव्हा संतप्त आंदोलकांनी पोलिस पथकावर हल्ला हल्ला चढवला. आंदोलकांनी पोलिसांच्या वाहनाची तोडफोड केली आणि ते पेटवून दिले. सध्या पोलिस परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
मुर्शिदाबादमधील हिंसाचाराबद्दल भाजप नेते अमित मालवीय यांनी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर टीका केली आहे. “पश्चिम बंगाल पोलिस मुर्शिदाबादच्या रस्त्यांवरून उफाळून येणाऱ्या हिंसक इस्लामी जमावाला रोखण्यासाठी संघर्ष करत आहेत – कदाचित गृहमंत्री ममता बॅनर्जी यांच्याच निर्देशानुसार. त्यांच्या प्रक्षोभक भाषणांमुळे सध्याच्या अशांततेला थेट हातभार लागला आहे,” असे अमित मालवीय म्हणाले.
हे ही वाचा :
पुनर्वास एज्युकेशन सोसायटीतर्फे गुरुवारी जागतिक होमिओपॅथी दिन
पुण्यात सलूनमध्ये तरुणीचे धर्मांतर; चालकाला चोप!
मनोरंजन कालिया यांच्या घराबाहेर झालेल्या स्फोटामागे आयएसआयचा हात
श्रेयस अय्यर – मार्च महिन्याचा खरा सुपरस्टार
ते पुढे म्हणाले, या भागातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या आहेत. हा तोच प्रदेश आहे जिथे अलिकडच्या कार्तिक पूजा उत्सवादरम्यान हिंदूंवर वारंवार हल्ले झाले होते. तणाव वाढल्याने अनेक गाड्या थांबवण्यात आल्या. ममता बॅनर्जी यांच्या मुस्लिम तुष्टीकरणामुळे बंगाल बांगलादेश बनत आहे, असे मालवीय म्हणाले.