बद्रिनाथला मुंबईतील भाविकांची कार दरीत काेसळली आणि

कार नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे झाला अपघात

बद्रिनाथला मुंबईतील भाविकांची कार दरीत काेसळली आणि

बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सकाळी कार दरीत कोसळल्याची घटना घडली. या कारमधील प्रवासी मुंबईचे असल्याचे समोर आले आहे.

या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले. कारमधील प्रवासी मुंबईचे हाेते. माहिती मिळताच पोलिस-प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले, मात्र तोपर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला होता.

रुद्रप्रयाग जिल्ह्यातील उखीमठ येथील रहिवासी असलेला कार चालक रवींद्र सिंग, मुलगा ज्ञान सिंग एम्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. मृत प्रवाशांपैकी एक शिवाजी असे नाव आहे. पोलीस स्टेशन प्रभारी मुनी की रेती रितेश शाह यांनी सांगितले की, इतर तीन मृत प्रवाशांची ओळख पटवली जात आहे. ब्रह्मपुरी श्री राम तपस्थलीजवळ कार अचानक नियंत्रणाबाहेर जाऊन ५० मीटर खोल दरीत कोसळल्याने हा अपघात झाला.

हे ही वाचा:

चीनचे सैनिक या भागातून चाललेत मागे

वणीच्या सप्तशृंगी मातेचे का दिसते आहे हे वेगळे रूप?

राणी एलिझाबेथ यांच्या निधनाबद्दल एक दिवसाचा दुखवटा

याकुब मेमन कबर प्रकरणात मुख्यमंत्री काय म्हणाले?

भाविक हरिद्वारहून हिमालयातील बद्रीनाथ येथे जात होते. अपघाताच्या वेळी रुद्रप्रयागच्या उखीमठ येथील रहिवासी असलेल्या चालकासह सहा जण कारमध्ये होते. पोलिसांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक रमेश कुमार सैनी आणि उपनिरीक्षक आशिष शर्मा राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले.

Exit mobile version